raghunathdada patil and raju shetty | Sarkarnama

शेतकरी संघटनांमध्ये विविध राजकीय पक्षांनी फूट पाडली - रघुनाथदादा पाटील

संपत मोरे
रविवार, 18 नोव्हेंबर 2018

पुणे : कॉंग्रेस राष्ट्रवादीने शेतकरी संघटनेत फूट पाडली तर भाजपने आमच्यातील काहींना लाचार बनवले आणि त्यांच्याबरोबर जे गेले त्यांच्यातही भांडणे सुरू झाली. एका जीवाने रहात होते पण पटलं नाही, त्यांच्यातही भाजपने भांडणे लावली. मोह सगळ्यात वाईट आहे, मोहापुढं साक्षात विश्वामित्रसुद्धा बळी पडला आणि हे तर काय ? किस झाड की पत्ती? अशा शब्दात शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी राजू शेट्टी, सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केली. 

शेतकरी संघटना बलवान होऊ नये म्हणून कॉंग्रेस राष्ट्रवादीने जंग जंग पछाडले. आमच्यात गैरसमज निर्माण केले. फूट पाडली. आमची संघटना बळकट झाली तर त्याना हादरा बसेल अशी भीती होती. त्यानी आमच्यातील शक्तीचे विभाजन केले. त्यानंतर आमच्यातील काहीजण भाजपच्या अच्छे दिनाला भुलले, तिकडे गेले. सत्तेसाठी लाचार झाले. तिथं त्यांच्यात भाजपने फूट पाडली. ते आता एकमेकांच्या विरोधात दंड थोपटू लागले आहेत. मोह माणसाला काहीच सुचून देत नाही. विश्वामित्रासारखा ऋषी मोहाला बळी पडला हे तर किस झाड की पत्ती? असेही पाटील म्हणाले. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख