raghunathdada patil about hatkanangle loksabha | Sarkarnama

हातकणंगल्यात प्रकाश आंबेडकरांचे बळ रघुनाथदादांना?

संपत मोरे
बुधवार, 24 ऑक्टोबर 2018

युतीबाबत किशोर ढमाले यांची चर्चा सुरु आहे. युती होईल अशी खात्री आहे. मात्र नाही झाली तरी मी निवडणूक लढवणार आहे.

- रघुनाथदादा पाटील

पुणे: "मी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमची युती व्हावी म्हणून प्रयत्न सुरु आहेत. त्यांच्याशी युती झाली तर आमचे बळ वाढेल," असा विश्वास शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी व्यक्त केला.

रघुनाथदादा पाटील यांनी 2009, 2014 ची लोकसभा निवडणूक हातकंणगलेमधून लढविली आहे. 2019 च्या  निवडणुकीविषयी पाटील म्हणाले, "आमच्या शेतकरी सुकाणू समितीच्यावतीने सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड किशोर ढमाले हे प्रकाश आंबेडकर यांच्याशी युतीबाबत बोलत आहेत. आमची त्यांच्याशी नक्की युती होईल. या युतीचा उमेदवार म्हणून हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक आहे." 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख