rafela result today | Sarkarnama

राफेल खटल्याचा उद्या निकाल 

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

नवी दिल्ली : सत्ताधारी, विरोधकांसह अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या "राफेल' खटल्याचा फैसला सर्वोच्च न्यायालय उद्या (ता. 14) सुनावणार आहे. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठाने 14 नोव्हेंबरला निकाल राखून ठेवला होता.
 
राफेल विमान खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत कॉंग्रेस पक्षाने सत्ताधारी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना घेरले होते. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी यावरून अनेकदा पंतप्रधान मोदींवर थेट टीका केली होती. 

या व्यवहाराची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी, या मागणीसाठी ऍड. एम. एल. शर्मा यांनी सर्वप्रथम न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर ऍड. विनीत धांडा आणि आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनीही या प्रकरणी याचिका दाखल केल्या. माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी यांच्यासह ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनीही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. 

राफेल खरेदी व्यवहारात अनियमितता झाल्याचा आरोप करत या प्रकरणी सीबीआयला गुन्हा नोंदवण्याचे आदेश देण्यात यावेत, अशा याचिकाकर्त्यांनी मागणी आहे. 

या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्या वेळी केंद्र सरकारने राफेल विमानाच्या किमतीची माहिती बंद लिफाफ्यात सादर केली, तसेच राफेल विमान खरेदी करताना सर्व नियम आणि अटींचे पालन करण्यात आले होते, असे न्यायालयात स्पष्ट केले होते.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख