rafale inquiry congress attack bjp | Sarkarnama

 राफेल प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी झालीच पाहिजे : अभिषेक मनु सिंघवी 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 16 डिसेंबर 2018

मुंबई : राफेल प्रकरणी संसदेच्या संयुक्त संसादीय समिती मार्फत चौकशी करण्याची मागणी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी केली. 

भाजपा सरकारने गेली चार वर्षे जनतेची फसवणूक केली असून राफेल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयालाही फसवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शाह व भाजपचे कायदा मंत्री यांनी मिळून चुकीची कागदपत्रे व पुरावे सर्वोच्च न्यायालयाला बंद पाकिटात दिली. या सरकारने मंत्र, तंत्र व अधिकार वापरून सर्वोच्च न्यायालयालाही फसवले असा आरोपही सिंघवी यांनी केला आहे. 

बंद पाकिटातील कॅग अहवाल हा संसदेत मांडला गेला पाहिजे. कॅगचा अहवाल सर्वांसमोर उघड झाला पाहिजे. राफेल विमानाच्या किमतीची माहिती कॅगला देण्यात आली आणि कॅगच्या अहवालाचा एक भाग संसदेच्या लोकलेखा समितीच्या सुपूर्द करण्यात आला असून तो सार्वजनिक करण्यात आला आहे, असे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपत्रात म्हटले आहे. परंतु कॅगचा अहवाल लोकलेखा समितीपुढे मांडलेलाच नाही, अशी माहिती सिंघवी यांनी दिली.  

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख