rafael-deal-new-email | Sarkarnama

राफेल प्रकरणाला नवे वळण; राहुल गांधींच्या हाती ईमेल

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्योगपती अनिल अंबानी यांचे राफेल व्यवहारात मध्यस्थ होते, असा सनसनाटी आरोप कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला.

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्योगपती अनिल अंबानी यांचे राफेल व्यवहारात मध्यस्थ होते, असा सनसनाटी आरोप कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला.

राहुल गांधी यांच्या हाती एअरबसच्या अधिकाऱ्याचा नवा ईमेल हाती लागला आहे. त्याआधारे त्यांनी वरील आरोप केला आहे. राहुल गांधी यांनी सांगितले, की राफेल व्यवहाराच्या सामंजस्य करारावर सह्या होण्यापूर्वीच अनिल अंबानी फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांना भेटले. त्यानंतर दहा दिवसांनी होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यादरम्यान करारावर सह्या होतील, असे अंबानी यांनी फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांना सांगितले. याची कल्पना भारताचे तत्कालीन संरक्षण मंत्र्यांसह परदेशी सचिव, एचएएल कंपनीलाही माहिती नव्हती. त्यामुळे सामंजस्य करार होणार आहे, हे फक्त अंबांनींना दहा दिवसांपूर्वी कसे माहीत ?  हा सरळसरळ गुप्ततेचा भंग आहे.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख