राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात पडला शतकातील उच्चांकी पाऊस 

दहा दिवसांत पाणलोट क्षेत्रात पडलेला पाऊस शतकातील उच्चांकी ठरला.
राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात पडला शतकातील उच्चांकी पाऊस 

राधानगरी :  राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात एक ते दहा ऑगस्ट या दहा दिवसांच्या काळात झालेल्या पावसाने राधानगरी धरणाचे सात दशकांचे पावसाचा विक्रम मागे टाकला. दहा दिवसांत पाणलोट क्षेत्रात पडलेला पाऊस शतकातील उच्चांकी ठरला.

एक ऑगस्टपासून धरण पाणलोट क्षेत्रात 24 तास अतिवृष्टी होती. त्यापूर्वीच 31 जुलैला धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. त्या दिवसापर्यंत दोन हजार 766 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. एक ते दहा ऑगस्ट या दहा दिवसांतच धरण क्षेत्रात तब्बल दोन हजार 191 मिलिमीटर इतका पाऊस झाला.

धरण क्षेत्रात आतापर्यंत पाच हजार 151 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी संपूर्ण पावसाळ्यात धरण क्षेत्रात एकूण तीन हजार 900 मिलिमीटर इतका पाऊस झाला होता.

धरण क्षेत्रात आताच गतवर्षीच्या तुलनेत दोन हजार251 मिलिमीटर इतका अधिक पाऊस झाला आहे. अद्याप पावसाळा संपण्यास महिन्याभराचा अवधी आहे. त्यामुळे यंदाचा पाऊस रेकॉर्डब्रेक ठरणार आहे.

राधानगरी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर आतापर्यंत पाण्याचा 10 टीएमसी एवढा निव्वळ विसर्ग करण्यात आला आहे. हे पाणी विनावापरच सोडावे लागले. काळम्मावाडी धरणातून केवळ दहा दिवसांत पाच टीएमसी पाण्याचा विसर्ग झाला.

राधानगरी धरणाचे खुले असल्याने दोन स्वयंचलित दरवाजे आज सकाळी बंद झाले. आता केवळ पायथा वीजगृहातून वीजनिर्मितीसाठी सोडलेल्या चौदाशे क्‍युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

धरणातून होणारा मोठ्या प्रमाणातील विसर्ग थांबल्याने भोगावती नदीच्या पुराची व्याप्ती व तीव्रता कमी झाली आहे. धरण क्षेत्रात 24 तासांत 74 मिलिमीटर पाऊस झाला. काळम्मावाडी धरण आज 95 टक्के भरले आहे.

धरणात 24 टीएमसी पाणीसाठा आहे. धरण पूर्ण भरण्यास आता केवळ दीड टीएमसी पाणीसाठा होणे बाकी आहे. या धरण क्षेत्रात 58 मिलिमीटर पाऊस झाला धरणाचे पाच वक्राकार दरवाजे बंद केल्याने धरणातून होणारा विसर्ग थांबला आहे. केवळ वीजनिर्मितीसाठी 950 क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com