शेतकऱ्यांनी मंत्रालयात येऊच नका असे जाहीर करा - राधाकृष्ण विखे

शेतकऱ्यांनी मंत्रालयात येऊच नका असे जाहीर करा - राधाकृष्ण विखे

मुंबई : राज्यातील शेतकऱ्याला आपले निवेदन घेऊन आले असता हे सरकार शेतकऱ्यांना अटक करते, मारहाण करते मग शेतकऱ्यांनी मंत्रालयात येऊ नकाच असे जाहीर करा असे उद्वेगपूर्ण उद्‌गार विधानसभेतले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढणारे शेतकरी विजय जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा मुद्दा विधानसभेत शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी उपस्थित केला. यावेळी विखे पाटील बोलत होते. 

आमदार अजय चौधरी यांनी विधानसभेत सांगितले की, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढणारे शेतकरी विजय जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विजय जाधव आज सकाळी विधान भवन गेट बाहेर निदर्शन करणार होते. त्यापूर्वीच मध्यरात्री पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

आता आझाद मैदानात पोलिसांच्या देखरेखीत निदर्शन त्यांचे निदर्शन सुरू असल्याचे चौधरी यांनी विधानसभेत सांगितले. यावेळी विखे पाटील म्हणाले, मंत्रालयात आलेल्या शेतकऱ्यांना मारहाण होते. त्या शेतकरी मारहाण प्रकरणी सरकारने चौकशी करू असे आश्वासन दिले होते. त्या चौकशीचे काय झाले अद्याप माहीत नाही. मग सरकारने शेतकऱ्यांनी आपलं गाऱ्हाणे घेऊन मंत्रालयात येऊ नये असे सांगून टाकावे म्हणजे शेतकरी मंत्रालयात येणार नाहीत.

अशा वारंवार घटना घडतात. पोलिस मारहाण करतात. सरकारला निवेदन करावे लागते. त्यामुळे पोलिसांना शेतकऱ्यांशी संवेदनशील वागण्याची समज देण्याची मागणी विखे पाटील यांनी केली. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पोलिसांना शेतकऱ्यांशी संवेदनशील वागण्याचा समज देण्याचा आदेश दिला.

या चर्चेत शिवसेना आमदार आणि कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले होते. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com