प्रज्वलित दिव्यांमुळे कोरोनाशी लढण्याचा नवा आत्मविश्वास : विखे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिवे प्रज्वलित करण्याचे आवाहन केले. त्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्यामुळे नैराश्‍याने ग्रासलेल्या देशवासीयांमध्ये नवा उत्साह निर्माण झालाअशी प्रतिक्रिया आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली
Radhakrishna Vikhe Lighting Lamp at his Residence
Radhakrishna Vikhe Lighting Lamp at his Residence

लोणी  : "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिवे प्रज्वलित करण्याचे आवाहन केले. त्यास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्यामुळे नैराश्‍याने ग्रासलेल्या देशवासीयांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला. प्रज्वलित दिव्यांनी कोरोनाच्या संकटाशी लढण्यासाठी नवा आत्मविश्वास निर्माण केला,'' अशी प्रतिक्रिया आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली.

पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनास प्रतिसाद देताना विखे पाटील यांनी कुटुंबीयांसह लोणी येथील निवासस्थानी दिवे प्रज्वलित करून उपक्रमात सहभाग घेतला. विखे पाटील म्हणाले, "कोरोनाच्या संकटाने नागरिक भयग्रस्त व नैराश्‍यात होते. पंतप्रधान मोदी देशवासीयांना दिलासा देण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. या संकटाचा सामना करण्यासाठी नागरिकांमध्ये नवा आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी दिवे प्रज्वलित करण्याच्या आवाहनाला संपूर्ण देशभरातून उत्साही प्रतिसाद मिळाला. ते पाहता, या संकटाचा सामना करण्यासाठी मोदी यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देश एकजुटीने सज्ज असल्याचा संदेश जगाला मिळाला.''

"जनता कर्फ्यू, नंतर टाळ्या आणि थाळीनाद करून या लढाईत कर्तव्य बजावत असलेल्या लोकांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचे पंतप्रधानांचे आवाहन देशवासीयांनी यशस्वी केले होते. याच पार्श्वभूमीवर भारतीय संस्कृती आणि परंपरेत दिव्यांचे असलेले महत्त्व मोठे आहे. अंधकारातून प्रकाशाकडे जाण्याचा संदेश आम्हाला प्रज्वलित दिव्यांतून मिळतो. हीच संकल्पना घेऊन देशात नवा उत्साह निर्माण करतानाच, कोरोनाच्या या संकटाशी लढाईसाठी आवश्‍यक सकारात्मक ऊर्जा आणि उमेद प्रज्वलित दिव्यांमधून सर्वांनाच मिळाली,'' याकडे विखे पाटील यांनी लक्ष वेधले.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com