उद्या प्रदेशाध्यक्षांवर काँग्रेस पक्ष सोडण्याची वेळ येणार नाही ना ? : विखे 

काँग्रेस व राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणारांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. उद्या प्रदेशाध्यक्षांवर काँग्रेस पक्ष सोडण्याची वेळ येणार नाही ना ? -राधाकृष्ण विखे पाटील
radhakrushna_vikhe_balasahe
radhakrushna_vikhe_balasahe

संगमनेर:  वर्षानूवर्षे केवळ मुठभर लोकांचा विकास करून गोरगरीब व गरजवंताना विकासापासून जाणिवपूर्वक वंचित ठेवले गेले. भुलभुलैयावर आता जनतेचा विश्वास राहीला नसल्याने लोकसभेच्या निकालातून जनतेने युतीलाच पाठबळ दिले.

आता राज्यातही चित्र बदलत चालले आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणारांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. उद्या प्रदेशाध्यक्षांवर काँग्रेस पक्ष सोडण्याची वेळ येणार नाही ना ? असा खोचक सवाल गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

 संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथे 2 कोटी 76 लाख रूपयांच्या राष्ट्रीय पेयजल योजनेतंर्गत नळपाणी पुरवठा योजनेसह 36 लाखांच्या विविध विकास कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाळीग्राम होडगर होते.
 

राधाकृष्ण विखे पुढे म्हणाले, गेल्या 25 वर्षात काहींनी केवळ निळवंडे व कालव्याबाबत विखेंचा संबंध नसतानाही बदनामी केली.  मात्र उशीरा का होईना पिचडांनी भुमिका बदलल्याने निळवंडे कालव्याच्या कामांना गती मिळाली. मालुंजे, डिग्रस, अंभोरेसह परिसराशी जिल्हा परिषद निवडणुकीच्या काळात जास्त जवळीक झाली. मागणीप्रमाणे सर्व कामांच्या दुरुस्तीसह अनेक गोष्टींची दुरूस्ती करायची असल्याचे सूचक विधान विखे पाटील यांनी केले.

 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळमुक्त महाराष्ट्राच्या दिशेने पाऊल टाकून, अंमलबजावणी सुरु केली आहे. मराठा, धनगर आरक्षणाबाबत निर्णायक भुमिका घेतली आहे. वर्षभरातचं मालुंजे, डिग्रस, अंभोरे गावाचा पाणी प्रश्न सोडवून ही गावे टँकरमुक्त करण्याचा निर्धार श्री विखे यांनी  व्यक्त केला. यावेळी शाळीग्राम होडगर, रखमा खेमनर यांची भाषणे झाली. सुत्रसंचालन सुभाष हाळनोर यांनी केले.या वेळी सर्व प्रमुख पदाधिकारी, सरपंच संदीप घुगे, उपसरपंच जनार्धन खरात आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com