खडसेंना सत्तेत ठेवलं नाही म्हणून मंत्रालयात उंदरांचा सुळसुळाट - विखे पाटीलांचा  चिमटा

मंत्रालयात उंदरांचा सुळसुळाट झाला आहे. उंदीर मारण्यासाठी सरकारने बोके आणले पाहीजे होते. तसेही आता तुमच्याकडे बरेच बोके तयार झाले आहेत. राज्यातील सत्तेत खडसेंना ठेवलं नाही म्हणून मंत्रालयात उंदरांचा सुळसुळाट झाला. खडसेंना सत्तेत आणा ते सर्व उंदरांची बंदोबस्त करतील.-राधाकृष्ण विखे पाटील
Vikhe-Khadse
Vikhe-Khadse

मुंबई  :" मंत्रालयात उंदरांचा सुळसुळाट झाला आहे. उंदीर मारण्यासाठी सरकारने बोके आणले पाहीजे होते. तसेही आता तुमच्याकडे बरेच बोके तयार झाले आहेत. राज्यातील सत्तेत खडसेंना ठेवलं नाही म्हणून मंत्रालयात उंदरांचा सुळसुळाट झाला. खडसेंना सत्तेत आणा ते सर्व उंदरांची बंदोबस्त करतील", असा चिमटा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारला काढला.

विरोधी पक्षाच्या वतीने कायदा व सुवव्यस्थेसंदर्भात नियम 293 अन्वये दाखल केलेल्या प्रस्तावार ते विधानसभेत बोलत होते. मंत्रालयात 3 लाख 19 हजार 400 उंदीर मारण्यात आले असून मंत्रालयातील उंदीर निर्मुलनात मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. खडसेंच्या याच आरोपाचा संदर्भ घेत मंत्रालयात उंदरांचा मंत्रालयात सुळसुळाट झाला आहे, असे सांगत राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर चांगलेच टिकास्त्र सोडले.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, " उंदीर मारण्यासाठी सरकारने बोके आणले पाहीजे होते. तसेही आता तुमच्याकडे बरेच बोके तयार झाले आहेत. राज्यातील सत्तेत खडसेंना ठेवलं नाही म्हणून मंत्रालयात उंदरांचा सुळसुळाट झाला. खडसेंना सत्तेत आणा ते सर्व उंदरांची बंदोबस्त करतील, असा चिमटाही विखे पाटील यांनी काढला.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी सरकार धारेवर धरले. विखे पाटील म्हणाले, " अडीच महिने मिलिंद एकबोटे पोलिसांना सापडत नाही. ही राज्य सरकार पुरस्कृत दंगल आहे. या प्रकारचं पत्र मी मुख्यमंत्र्यांना लिहिल.  हायकोर्टाने  मिलिंद एकबोटेंना सरकार का अटक करतं नाही असे विचारले तेव्हा सरकारने सांगितल मिलिंद एकबोटे आम्हांला सापडत नाही. त्यामुळे जेव्हा सुप्रीम कोर्टाने जामीन अर्ज फेटाळण्यात आला तेव्हा अटक करण्यात आली. "


"कोरेगाव भीमामध्ये दंगल घडली तेव्हा एसआयडी काय करतं होती ? याला सरकारचा पाठींबा होता का ?  किंवा इंटेलिजन्स आधिकाऱ्यांनी माहीती दिली नसेल तर त्यांच्यावर कारवाई करावी. यांचे इंटेलिजन्स आधिकारी माझ्या घरात घुसून लक्ष ठेवतात. मात्र इतकी घटना घडली तरी त्यांना माहिती होत नाही. कोरेगाव भीमाप्रकरणात पोलिसांची निष्क्रियता दिसून आली आहे. मिलिंद एकबोटे आतमध्ये संभाजी भिडे बाहेर आहेत. कोरेगाव भीमा ही घटना उजव्या संघटनेच्या विचाराने जाणीवपूर्वक फूट पाडण्याचा  केलेला प्रयत्न आहे ," असा  आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com