राधाकृष्ण विखे यांच्या निमित्ताने भाजप राज्यात काँग्रेसला खिंडार पाडणार का ?

विखेंच्या काँग्रेस यात्रेत आणखी कॉंग्रेस आमदार जोडले जातील . सर्व विखे समर्थक नसले तरी थेट भाजपच्या संपर्कात असलेले काँग्रेसचे काही आमदारही जूनमध्ये पक्षांतर करण्याच्या तयारीत असल्याचे समजते .
Fadnavis-Vikhe
Fadnavis-Vikhe

मुंबई : विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे यांचा भाजप प्रवेशाचा निर्णय पक्का झाल्यानंतर त्यांच्यासोबत कॉंग्रेसचे सध्या तीन आमदार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पण काँग्रेसमधून येत्या माहिन्याभरात एकूण १० ते १२ आमदार फुटून भाजपमध्ये जाण्याच्या हालचाली सुरु आहेत असे समजते . 

विखेंच्या काँग्रेस यात्रेत आणखी कॉंग्रेस आमदार जोडले जातील . सर्व विखे समर्थक नसले तरी थेट भाजपच्या संपर्कात असलेले काँग्रेसचे काही आमदारही जूनमध्ये पक्षांतर करण्याच्या तयारीत असल्याचे समजते . 

  किमान बारा कॉंग्रेस आमदार भाजपमध्ये प्रवेश करतील असा दावा विखे-पाटील यांच्या निकटवर्तीयांकडून केला जात आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह कॉंग्रेस आमदार अब्दुल सत्तार, कालिदास कोळंबकर व जयकुमार गोरे यांनी कॉंग्रैसला रामराम करत भाजप प्रवेशाची तयारी सुरू केली आहे. यापैकी अब्दुल सत्तार  यांना रावसाहेब दानवे यांनी गळाला  लावलेले असून त्यांची दोन वेळा मुख्यमंत्र्यांशी भेट घडवून आणलेली आहे .
 कालिदास   कोळंबकर गेल्या वर्षभरापासून थेट मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असून त्यांनी आपल्या संपर्क कार्यालयावर ऐन लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे छायाचित्र लावल्याने खळबळ उडाली होती . जयकुमार गोरे यांनीही लोकसभेला माढ्यात भाजपचे काम केले होते .  जूनच्या पहिल्या आठवड्यात कॉंग्रेसचे हे बंडखोर आमदार भाजपमध्ये अधिकृतपणे प्रवेश करतील असे चित्र आहे.   

याशिवाय पुणे,  सातारा , मराठवाडा खान्देश आणि नगर जिल्ह्यातही काही आमदारांशी भाजपची चर्चा  सुरु असल्याचे समजते .  येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपला ताकद देऊ शकणाऱ्या  आणि भाजपच्या वाट्याला जागा असलेल्या आमदारांशी त्यादृष्टीने संवाद होत असल्याचे समजते . 

राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील पदाधिकारी भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याचे आजच जाहीरपणे सांगितले आहे . 

विधानसभेत सध्या कॉंग्रेस 42 तर राष्ट्रवादी 40 असे संख्याबळ आहे. मात्र विधानसभेतील राष्ट्रवादीचे संख्याबळ कॉंग्रेसपेक्षा अधिक राहणार असल्याने विरोधी पक्ष नेतेपदावर दावा करण्याचा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सूर आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com