विखे पिता-पुत्रांचे पंतप्रधानांना निमंत्रण

दिवंगत लोकनेते बाळासाहेब विखे पाटील यांनी शब्दबद्ध केलेल्या `देह वेचावा कारणी` या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आले आहे
Radhakrishan Vikhe and Sujay Vikhe Invites PM for Book Release Function
Radhakrishan Vikhe and Sujay Vikhe Invites PM for Book Release Function

नगर :  दिवंगत लोकनेते बाळासाहेब विखे पाटील यांनी शब्दबद्ध केलेल्या `देह वेचावा कारणी` या आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आले आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी दिल्ली येथे पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांना निमंत्रण दिले. हा प्रकाशन सोहळा प्रवरा परिवारातर्फे आयोजित करण्यात आला आहे. विखे पाटील यांनी पंतप्रधानांना निमंत्रण देताना त्यांचा साईबाबांची मूर्ती व शाल देऊन त्यांचा सत्कार केला. 

बाळासाहेब विखे पाटील यांनी या पुस्तकात त्यांच्या जीवनगाथेचे वर्णन केले आहे. त्यांच्या आठवणींना उजाळा म्हणून हा सोहळा भव्यदिव्य करण्याचे प्रवरा परिवाराचे नियोजन आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com