रामटेकमध्ये सेनेचे बंडखोर आशीष जयस्वालांचा ट्रॅक्टर सुसाट,  33 हजारांची आघाडी

रामटेकमध्ये सेनेचे बंडखोर आशीष जयस्वालांचा ट्रॅक्टर सुसाट,  33 हजारांची आघाडी

नागपूर : युतीचे बंडखोर व शिवसेनेचे माजी आमदार आशिष जयस्वाल यांनी तेराव्या फेरीअखेर 33 हजार 408 मतांची आघाडी घेतली. जयस्वाल यांनी 49 हजार 539 मते मिळाली आहेत. भाजपचे मल्लिकार्जून रेड्डी यांना 28 हजार 1 मते मिळाली असून कॉंग्रेसचे उमेदवार उदयसिंग यादव यांना 23 हजार 452 मते मिळाली आहे. आशिष जयस्वाल यांचा विजय निश्‍चित मानला जात आहे.


शिवसेनेला जागा न सोडल्याने नाराज झालेल्या ऍड आशिष जयस्वाल यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. प्रचारात आघाडी घेतल्यावर मतमोजणी दरम्यान त्यांच्या प्रचाराचे फलित दिसू लागले आहेत. पहिल्या फेरीपासूनच जयस्वाल यांची आघाडी वाढत होती. तर दुसऱ्या क्रमांकासाठी भाजपचे डी.एम रेड्डी व कॉंग्रेसचे यादव यांच्यात लढत आहे. प्रहारचे उमेदवार रमेश कारेमोरे हे अपेक्षेप्रमाणे करिश्‍मा दाखवू शकले नाहीत.


सिटिंग-गेटिंगचा फार्म्युला वापरून युतीमध्ये रामटेक आपल्या जवळ ठेवण्यात भाजप यशस्वी झाली. यामुळे खनिकर्म महामंडळ देऊन खूश करण्याचा भाजपच्या प्रयत्नाला जयस्वाल यांनी प्रतिसाद न देता अपक्ष उमेदवारी दाखल करून भाजपसमोरच पेच निर्माण केला होता. तो मतमोजणीत समोर आला आहे. याच रेड्डी यांना असलेला पाठिंबा गोंगपाने काढल्याने मोठा फटका बसला आहे. तीन वेळा आमदार असलेल्या जयस्वाल यांचा रामटेक मतदारसंघातील घराघरात वावर आहे. यामुळे त्याचा फायदा झाला आहे.


 त्याची प्रचिती निकालात दिसू लागली आहे. कॉंग्रेसचे यादव यांच्यासाठी गावागावातील कॉंग्रेसचे कार्यकर्त्यांनी मत दिले हे देखील समोर आल्याने मागील वीस वर्षांपासून जागा शोधण्याच्या प्रयत्नात कॉंग्रेसला थोडेफार यश आले आहे. रामटेकचा निकाल सत्ताधारी भाजपसाठी धक्कादायक तर युतीमधील शिवसेनेला बळ देणारा ठरला आहे. कॉंग्रेसने मारलेली मुसंडी भविष्यातील आशा पल्लवीत करणाऱ्या आहेत.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com