राष्ट्रवादी पक्ष जलप्रलयाचे राजकारण करणार नाही : आर के पोवार 

 राष्ट्रवादी पक्ष जलप्रलयाचे राजकारण करणार नाही : आर के पोवार 

कोल्हापूर : नुकत्याच झालेल्या जलप्रलयाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राजकारण करणार नाही, अशी शिकवण आमचे देशाचे नेते शरद पवार यांनी दिलेली आहे. परंतु , वस्तुस्थिती मांडून पूरग्रस्तांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे हे विरोधी पक्षाचे कामच आहे. जनतेसाठी ते आम्ही करतच राहणार, असे पत्रक राष्ट्रवादीचे कोल्हापूर शहराचे अध्यक्ष आर के पोवार यांनी प्रसिद्धीला दिले आहे. 

या पत्रकात पोवार यांनी पुढे म्हटले आहे, आमचे जिल्ह्याचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी 15 ऑगस्टला झेंडावंदन,  कार्यक्रमासाठी पालकमंत्र्यांनी पुणे येथे हजर न राहता कोल्हापूरमध्ये पूरग्रस्तांच्या बरोबर झेंडावंदन केले असते तर शासकीय यंत्रणा वेगाने कामाला लागली असती , असे विधान केले होते . त्यामध्ये त्यांची चूक काय होती ? 

मुश्रीफ गेली वीस वर्षे सलग आमदार आहेत . त्यापैकी 15 वर्षे ते मंत्री आणि बरीच वर्षे विविध जिल्ह्यांचे पालकमंत्रीही होते. गेल्या तीस-पस्तीस वर्षातील त्यांचे सामाजिक आणि राजकीय काम हे ‘आता उरलो उपकारापुरता ‘ या जनसेवेच्या भावनेतूनच सुरू आहे .  एक महिना कार्यक्रम आधी ठरला होता व तो रद्द करता येणार नाही असे भाजपचे नेते हास्यास्पद विधान करीत आहेत. 

पालकमंत्री पाटीत हे दोन नंबरचे मंत्री आहेत . त्यांनी ठरवले असते की यावेळी आपण स्वातंत्र्यदिना दिवशी पूरग्रस्तांबरोबर राहणार . त्यांना कोणी अडवले असते व तसा कोणता कायदा आहे ? अशा विधानांमुळे अज्ञान प्रकट होते . राष्ट्रवादी पक्षाचे मत एवढेच होते,  की पाच ऑगस्ट 2019 रोजी 75 टक्के पेक्षा ज्यादा धरणे भरलेली आहेत .  अलमट्टीतून चार लाख क्युसेक्सपेक्षा ज्यादा विसर्ग होणेसाठी कर्नाटक व केंद्र सरकारवर दबाव आणावा . ते न झाल्यामुळेच सोमवारी रात्रीच पाणी शहरांमध्ये व जिल्ह्यामध्ये घुसले .

 यावेळी स्वयंसेवी संस्था , सार्वजनिक सहकारी संस्था, सर्वच राजकीय व सामाजिक कार्यकर्ते , तरुण मंडळे यांनीच आपल्या जिवाची बाजी लावून 80 टक्के लोकांना सुरक्षित स्थळी हलवले .त्यांना त्यांच्या कार्याबद्दल सलाम . एनडीआरएफच्या बोटी व टीम गुरुवारी ता. 8 ऑगस्ट 2019 रोजीपासून दाखल झाल्या. त्यांच्या अतुलनीय कामगिरीबद्दल सॅल्यूट. परंतु;  पालकमंत्री 7 ऑगस्ट रोजी जिल्ह्यामध्ये पोहोचले व 12 ऑगस्ट रोजी मुंबईला गेले, तेव्हापासून ते बाहेरच आहेत. 

यापूर्वी ज्या ज्या वेळी कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यावर अशा आपत्ती आल्या , त्यावेळी परजिल्ह्यातील असलेले पालकमंत्रीसुद्धा  या जिल्ह्यात ठाणं मांडून जनतेला अहोरात्र मदत केल्याची उदाहरणे आहेत. पालकमंत्री श्री. आजपर्यंत ठाण मांडून बसले असते तर शासकीय यंत्रणा अधिक कार्यक्षमतेने कामाला लागली असती . मदतीसाठी पंचनामे निर्दोष झाले असते. सध्या नुकसान भरपाईबाबत दंगे सुरू आहेत.

चुकीचे पंचनामे झाले आहेत . या सर्व गोष्टी  पालकमंत्र्यांमुळे व्यवस्थित झाल्या असत्या. आमची त्यांना विनंती आहे की पूरग्रस्त जनता फामोठ्या संकटामध्ये आहे .शेतकरी , छोटे-मोठे दुकानदार,  वि यापारी यांचे भवितव्य संकटांमध्ये  सापडले आहे . दरम्यान, ज्यांना प्रचंड अधिकार आहेत,  ते पालकमंत्री जिल्ह्यात राहिले तर त्यांना आधार मिळेल. यामध्ये राजकारण करण्याचा आमचा मुळीच हेतू नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com