Queue at Aurangabad with free safe distance for needy dining | Sarkarnama

औरंगाबादेत मोफत शिवभोजनासाठी गरजूंच्या सुरक्षित अंतर ठेवून रांगा 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 26 मार्च 2020

. विशेष म्हणजे मोफत जेवणासाठी गरजूंनी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रनांच्या सूचना व नियमांचे पालन करत सुरक्षित अंतर राखले व रांगेत येऊन मोफत जेवणाचा लाभ घेतला .

औरंगाबाद : लॉकडाऊनच्या काळात मजूर, गोरगरिबांचे अन्न-पाण्यावाचून हाल होऊ नये यासाठी शिवसेनेने शिवभोजनच्या माध्यमातून अशा गरजूंना मोफत जेवण देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. आमदार अंबादास दानवे यांच्या पुढाकारातून अनेकांना याचा लाभ होत आहे.

विशेष म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर ठेवत गरजूंनी रांगा लावल्याचे दिसून आले.

औरंगाबाद शहरातील मोंढा परिसरात सर्वप्रथम दहा रुपयात पोटभर जेवण ही योजना शिवसेनेच्या वतीने सुरू करण्यात आली होती. शिवभोजनच्या माध्यमातून मोंढ्यातील मजूर, गोरगरीब महिला व पुरुष याचा लाभ घेत आहेत.

त्यानंतर ही योजना राज्य पातळीवर पोहोचली आणि महाविकास आघाडी सरकारने संपूर्ण राज्यातच दहा रुपयात पोटभर जेवण योजना लागू केली .

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लॉकडाऊन करण्यात आला आहे . अशावेळी हातावर पोट असणाऱ्या कुणावरही उपासमारीची वेळ येता कामा नये या उद्देशाने शासकीय रुग्णालय, शासकीय कर्करोग रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, रेल्वे स्टेशन,  बस स्थानक , चिकलठाणा विमानतळ समोरील झोपडपट्टी येथे अन्न पाकीट आणि पाण्याच्या बाटल्या पुरवण्यात येत आहेत.

लॉकडाऊनच्या काळातही गोरगरिबांना मोफत जेवण पुरवण्याचा आमदार अंबादास दानवे यांचा हा उपक्रम सामाजिक बांधिलकी जपल्याचे एक उत्तम उदाहरण असल्याचे बोलले जाते .दानवे यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख