'उल्हासनगरातील डांबर खातय कोण?' नितीन राऊत यांनी दिले चौकशीचे आदेश 

19 ऑगस्ट 2019 रोजी कॉंग्रेसच्या नगरसेविका अंजली साळवे,नमहासचिव रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगरातील खड्यांचे लक्ष वेधण्यासाठी पालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता.नदरवर्षी खड्डे भरण्या करिता डांबरीकरणासाठी कोट्यावधी रुपये खर्च केला जातो किंबहुना दाखवला जातो.पण रोडवर डांबरीकरण झालेले दिसत नसल्याने कोट्यावधी रूपयांचे 'डांबर खातय कोण?"असा सवाल रोहित साळवे यांनी उपस्थित केला होता
PWD Miniser Nitin Raut Orders Inquiry in Ulhasnagar Tar Purchase
PWD Miniser Nitin Raut Orders Inquiry in Ulhasnagar Tar Purchase

उल्हासनगर : ''उल्हासनगरातील कोट्यावधीचे डांबर खातंय कोण?"या सवालाचे उत्तर मागण्यासाठी कॉंग्रेसच्या वतीने महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता. मात्र आंदोलनाला 5 महिने झालेत तरी पालिकेच्या वतीने उत्तर देण्यात आले नसल्याने कॉंग्रेसने डांबराची तक्रार थेट सार्वजनिक बांधकाम मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.ननिवेदनातील गांभीर्य बघून डांबराच्या या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश राऊत यांनी दिले आहेत.

19 ऑगस्ट 2019 रोजी कॉंग्रेसच्या नगरसेविका अंजली साळवे,नमहासचिव रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगरातील खड्यांचे लक्ष वेधण्यासाठी पालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता.नदरवर्षी खड्डे भरण्या करिता डांबरीकरणासाठी कोट्यावधी रुपये खर्च केला जातो किंबहुना दाखवला जातो.पण रोडवर डांबरीकरण झालेले दिसत नसल्याने कोट्यावधी रूपयांचे 'डांबर खातय कोण?"असा सवाल रोहित साळवे यांनी उपस्थित केला होता. खड्डे भरले जात नसल्याने रस्ते अपघातात वाढ झाल्याचा आरोप देखील रोहित साळवे यांनी करताना डांबरीकरणातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली होती.

तेंव्हा दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन उपायुक्त संतोष देहरकर यांनी दिले होते.मात्र पाच महिने उलटून गेल्यावरही कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नसल्याने नागपूर हिवाळी अधिवेशन गाठून सार्वजनिक बांधकाम मंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे डांबराच्या भ्रष्टाचाराची निवेदनाद्वारे लेखी तक्रार केल्याची माहिती रोहित साळवे यांनी दिली. डॉ. राऊत यांनी निवेदनाला गांभीर्याने घेतले असून तात्काळ चौकशी करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com