नीतेश राणेंवर कायदेशीर कारवाईचे चंद्रकांतदादांचे आश्‍वासन 

नीतेश राणेंवर कायदेशीर कारवाईचे चंद्रकांतदादांचे आश्‍वासन 

मुंबई : आमदार नीतेश राणे यांनी अभियंत्याला केलेल्या मारहाणीबाबत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून भविष्यात अशा घटना होऊ देणार नाही असे आश्‍वासन दिल्यानंतर मुंबईतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी आजचे आंदोलन स्थगित केले आहे. 

कोकणातील खराब रस्त्याच्या मुद्यावरून नीतेश राणे यांनी अभियंत्याच्या अंगावर चिखलफेक करून मारहाण केली होती. तसेच दमदाटीही केली होते. या घटनेचा सर्वत्र जाहीर निषेध करण्यात येण्याबरोबरच संतापही व्यक्त करण्यात आला होता. ज्या अभियंत्याला मारहाण झाली होती त्यांची सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट घेतली होती.

सरकारी कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज मुंबईतील अभियंते आज आंदोलन करणार होते. मात्र चंद्रकांतदादांनी दिलेल्या आश्‍वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले असले सर्व अभियंते काळ्या फिती लावून नीतेश राणे आणि मारहाण करणाऱ्या त्यांच्या समर्थकांचा निषेध करणार आहेत. 

दरम्यान, मुंबई महानगरपालिका अभियंता कृती समिती या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com