puthviraj chavan and bjp | Sarkarnama

राजकारण्यांना संचालकमंडळावर आणण्यासाठी उर्जित पटेलांचा बळी - पृथ्वीराज चव्हाण

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

सातारा : लोकशाहीतील सर्व संस्था हस्तगत करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी, व अर्थमंत्री जेटली सरकारचा प्रयत्न आहे. त्यामध्ये रिझर्व्ह बॅंकही अलिप्त राहिलेली नाही. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे राजकीय लोकांना रिझर्व्ह बॅंकेच्या संचालक मंडळावर नेमणे, हा या सरकारचा उद्देश आहे त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेचे आतापर्यंत चार वित्त सल्लागार सोडून गेले आहेत. आंतरराष्ट्रीय तज्ञ मोदी आणि जेटलींच्या हाताखाली काम करण्यासाठी तयार नाहीत हे देशाच्या अर्थव्यवस्थेचे गंभीर व चिंतेचे कारण आहे, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. 

रिझर्व्ह बॅंकेचे गर्व्हनर उर्जित पटेल यांनी काल राजीनामा दिला. यासंदर्भात आपली भुमिका मांडताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, रिझर्व्ह बॅंकेचे गर्व्हनर उर्जीत पटेल यांनी काल राजीनामा दिल्याची धक्कादायक बाब समोर आली. त्यांनी यामागे वैयक्तिक कारण सांगितले असले तरी काय काय चालले आहे ते आपल्याला सर्वांना माहिती आहे. 19 नोव्हेंबरला रिझर्व्ह बॅंकेच्या संचालक मंडळाची बैठक झाली. ती अत्यंत वादग्रस्त झाली होती. त्याच दिवशी उर्जित पटेल राजीनामा देणार असे वृत्त बाहेर आले होते. सर्व लोकशाहीच्या संस्था हस्तगत करण्याचा मोदी, जेटली सरकारचा प्रयत्न सुरू आहे. त्यामध्ये रिझर्व्ह बॅंक ही अलिप्त राहिलेली नाही. सरकारी विभाग असल्यासारखे तिचे रूपांतर करून तिची स्वायतत्ता संपवून टाकायचा हा त्याच प्लॅन आहे. 

बॅंकेतील तीन चार लाख कोटी रूपयांची गंगाजळी त्यांना वित्तीय कारणासाठी वापरायची आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे राजकिय लोकांना रिझर्व्ह बॅंकेच्या संचालक मंडळावर नेमणे हा त्यामागचा उद्देश आहे. आज हा चौथा वित्तीय सल्लागार सोडून गेला आहे. पहिल्यांदा अरविंद सुब्रमन्यम गेले. त्याआधी रघुराम राजन यांना काम करून दिले नाही. स्वत: अरविंद बानगरीया ज्यांना मोदींनीच आणले होते, त्यांनाही काम करून दिले नाही. आता चौथा वित्त सल्लागार सोडून गेले आहे. एकुणच आंतरराष्ट्रीय तज्ञ मोदी आणि जेटलींच्या हाताखाली काम करण्यासाठी तयार नाहीत हे अर्थव्यवस्थेचे गंभीर व चिंतेचे कारण आहे, असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख