`सतिश काकडेंचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे`       

...
satish kakde purushottam jagtap
satish kakde purushottam jagtap

सोमेश्वरनगर : सोमेश्वर कारखाना उत्कृष्ट सुरू असताना कृती समिती फक्त विरोधासाठी विरोध करत प्रगतीत आडकाठी आणत आहे. एकीकडे अजितदादांशी सलगी दाखवतात आणि दुसरीकडे त्यांच्याच नेतृत्वाखालील संस्थेला विरोध करतात हा दुटप्पीपणा आहे, अशी टीका कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप यांनी केली.

कृती समितीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. म्हणूनच त्यांच्या 'तुरा मोर्चा'ला शेतकरी फिरकले नाहीत. मोर्चा रद्द करण्याची नामुष्की त्यांच्यावर ओढवली, अशी खरमरीत टीका सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप यांनी केली. ही वेळ का ओढवली याचे आत्मचिंतन करा, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. 

शेतकरी कृती समितीने 6 जानेवारीला राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कारखान्यासमोरच संचालक मंडळाला जाब विचारणे आणि शेट्टी यांचा सत्कार कार्यक्रम आखला होता. तो रद्द करावा लागला होता. याबाबत जगताप म्हणाले, शेट्टी हे ठरल्याप्रमाणे निंबुत येथे आलेही. परंतु नियोजित असूनही सभासद, शेतकरी यांनी पाठ फिरवल्याने रद्दची नामुष्की ओढवली. गतहंगामात प्रतिटन 3300 रूपये भाव दिला. चालू हंगामात एफआरपीपेक्षा अधिक म्हणजे प्रतिटन 2800 रूपये दिले. व्हीएसआयसह नामांकित संस्थांचे सात पुरस्कार पाच वर्षात मिळाले. सहा वर्षात 266 कोटींची कर्जफेड करत कारखाना कर्जमुक्त केला. परंतु सभासदांची प्रगती होत असताना कृती समिती जाणूनबुजून विरोध करते, असा दावा जगताप यांनी केला. 

कृती समितीच्या दबावाने एकरकमी एफआरपी मिळाली असा बोभाटा केला आहे. परंतु दबाव फक्त अजितदादांचा आणि सभासदांचा घेतो. त्यामुळे आमच्यामुळे कारभार चालतो अशा भ्रमात राहू नका. जिल्ह्यातल्या सहकारी संस्थांनी अजितदादांच्या नेतृत्वाखाली राज्यात नावलौकीक केला आहे. एकीकडे दादांशी सलगी दाखवायची आणि दुसरीकडे त्यांच्याच नेतृत्वाखालील 'सोमेश्वर'ला विरोध करायचा हा दुटप्पीपणा आहे. अजितदादांना बदनाम करू नये. कृती समितीचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचा, हल्लाबोल जगताप यांनी केला.


प्रकल्प कर्ज, सॅाफ्टलोन, सभासद ठेव, सरकारी भागभांडवल याची परतफेड करण्यासाठी कारखान्याने 86 कोटी खर्च केले आहेत. स्प्रे पाँड, मोलासेस टँक, इथेनॅाल टँक अशी दहा कोटीची कामे कुठल्याही कर्जाशिवाय केली आहेत. त्यामुळे 85 कोटी कुठे गेले असा राहून राहू आरोप करू नये, असा खुलासाही जगताप यांनी केला. 

शेट्टींचा सत्कार राहून गेला...

राजू शेट्टी यांनी भाजपाला विरोध करत महाविकासआघाडीला साथ दिल्याबद्दल कारखान्याच्या वतीने त्यांचा सत्कार आयोजित केला होता तो राहिला. कारखान्याची प्रगती, एकरकमी एफआरपी, मागील उच्च दर अशी माहिती समजल्याने आणि शेतकरी न आल्याने शेट्टींनी कारखान्यावर येण्याचे टाळले. कृती समितीने शेट्टींकडून शिकावे, असा चिमटाही पुरूषोत्तम जगताप यांनी काढला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com