मुख्यमंत्र्यांनी काढली समजूत...अन्‌ पुरूषोत्तम जाधवांची माघार

युतीच्या जागावाटपाचा फटका बसलेले शिवसेनेचे खंडाळ्यातील नेते पुरूषोत्तम जाधव यांनी नाराज होऊन सातारा लोकसभेची पोटनिवडणुक आणि वाई विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे येथून भाजपचे उदयनराजे भोसले आणि वाईत मदन भोसले यांच्यापुढे जाधव यांनी आव्हान उभे केले होते. अखेर मुख्यमंत्र्यांनी जाधव यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क करून त्यांची समजूत काढली आणि त्यांनी दोन्ही मतदारसंघातील आपले अर्ज मागे घेतले.
Purushottam Jahdav - Devendra Fadanavis
Purushottam Jahdav - Devendra Fadanavis

सातारा : युतीच्या जागावाटपाचा फटका बसलेले शिवसेनेचे खंडाळ्यातील नेते पुरूषोत्तम जाधव यांनी नाराज होऊन सातारा लोकसभेची पोटनिवडणुक आणि वाई विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यामुळे येथून भाजपचे उदयनराजे भोसले आणि वाईत मदन भोसले यांच्यापुढे  जाधव यांनी आव्हान उभे केले होते. अखेर मुख्यमंत्र्यांनी जाधव यांच्याशी दुरध्वनीवरून संपर्क करून त्यांची समजूत काढली आणि त्यांनी दोन्ही मतदारसंघातील आपले अर्ज मागे घेतले.

युतीच्या जागा वाटपात शिवसेनेच्या वाट्याच्या जागांवर भाजपने आपले उमेदवार जाहिर केले. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील वाई, माण, आणि कऱ्हाड उत्तरमध्ये शिवसेनेच्या इच्छुकांची अडचण झाली होती. वाईतून भाजपने मदन भोसलेंना उमेदवारी दिली मुळात तेथून शिवसेनेतून पुरूषोत्तम जाधव इच्छुक होते. तसेच माणमधून शिवसेनेचे शेखर गोरे हे उमेदवार होते, तरीही विद्यमान माजी आमदार जयकुमार गोरे यांना भाजपने तिकिट दिले होते. तसेच कऱ्हाडला भाजपचे मनोज घोरपडे इच्छुक असताना धैर्यशिल कदम यांना शिवसेनेत घेऊन तिकिट दिले गेले. यासर्वांनी मैत्रीपूर्ण लढत म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. 

मात्र, पुरूषोत्तम जाधव यांनी नाराजीचा राग व्यक्त करताना वाईसह सातारा लोकसभेसाठीही अर्ज दाखल केला. त्यामुळे उदयनराजे भोसले आणि मदन भोसले यांची अडचण होणार होती. हे ओळखून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुरूषोत्तम जाधव यांची समजूत काढली. त्यांना आगामी काळात काही आश्‍वासने देऊन त्यांचे भाजप उमेदवारांविरोधातील दोन्ही अर्ज मागे घेण्यास भाग पाडले. आज पुरूषोत्तम जाधव यांनी सातारा लोकसभा आणि वाई विधानसभेसाठी दाखल केलेला अर्ज मागे घेतला.

त्यामुळे सातारा लोकसभेसाठी उदयनराजेंविरोधात श्रीनिवास पाटील अशी सरळ लढत होणार असून वाईमध्ये राष्ट्रवादीचे मकरंद पाटील विरूध्द भाजपचे मदन भोसले अशी लढत होणार आहे. पुरूषोत्तम जाधव यांना मागील 2009 च्या लोकसभा निवडणुकीत कऱ्हाड, पाटणमधून चांगली मते मिळाली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com