भाजपच्या पुरूषोत्तम जाधवांची पवारांशी वाढती जवळीक 

ही वाढलेली जवळीक आगामी काळात वेगळ्या समीकरणांची नांदी होऊ शकते.
भाजपच्या पुरूषोत्तम जाधवांची पवारांशी वाढती जवळीक 

सातारा : येथील भाजप नेते पुरूषोत्तम जाधव यांनी महाराष्ट्र कुस्ती दंगल स्पर्धेत 'यशवंत सातारा' या टिमचे मालकी घेतली आहे. यानिमित्ताने त्यांचा राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्याशी संपर्क वाढला आहे. श्री. जाधव यांच्या विनंतीनुसार श्री. पवार तीनवेळा यशवंत सातारा संघाचे सामने पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित राहिले. 

पुरूषोत्तम जाधव यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून 2009 मध्ये प्रथम शिवसेनेतून निवडणुक लढविली. यामध्ये त्यांना उदयनराजेंच्याविरोधात दोन लाख 35 हजार मते मिळाली होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र, त्यांना तिकिट न मिळाल्याने त्यांनी अपक्ष निवडणुक लढून एक लाख 55 हजार मते मिळविली होती. आता 2019 साठी पुन्हा सातारा लोकसभा मतदारसंघातून तयारी सुरू केली आहे.  

यादरम्यान महाराष्ट्र कुस्ती दंगल स्पर्धेत 'यशवंत सातारा' या टिमची मालकी जाधवांनी स्वीकारली. या टीममध्ये सातारा व बारामतीच्या पैलवानांचा समावेश आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने शरद पवार यांच्यापर्यंत पोहोचले. यशवंत संघाचे सामने स्वत: उपस्थित राहून पाहिले. तसेच या संघातील मल्लांचे कौतूकही केले. यानिमित्ताने भाजपचे नेते व सातारा लोकसभेसाठी इच्छुक असलेले पुरूषोत्तम जाधव यांची श्री. पवार यांच्याशी जवळीक वाढली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com