Do not cry if presidential rule will apply. maharashtra Politics | Sarkarnama

राष्ट्रपती राजवट लागल्यावर रडू नका !

राष्ट्रपती राजवट लागल्यावर रडू नका !

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 4 मार्च 2021

विधासभेच्या अध्यक्षपद रिक्त ठेवणे हे घटनात्मक तरतुदींचे उल्लंघन आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय आजच घ्या. अशी चुक करू नका आणि राष्ट्रपती राजवट लागली तर रडू नका, असे भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज राज्य सरकारला सुनावले.

मुंबई : विधासभेच्या अध्यक्षपद रिक्त ठेवणे हे घटनात्मक तरतुदींचे उल्लंघन आहे. त्यामुळे याबाबतचा निर्णय आजच घ्या. अशी चूक करू नका आणि राष्ट्रपती राजवट लागली तर रडू नका, असे भारतीय जनता पक्षाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आज राज्य सरकारला सुनावले. 

विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास संपल्यावर मुनगंटीवार यांनी पॅांईंट अॅाफ प्रोसीजरचा विषय उपस्थित केला. यावेळी विधानसभेच्या अध्यक्षांच्या नियुक्त्या व त्यातील रिक्त कालावधींचा तपशील सादर केला. ते म्हणाले आजवर कधीही विधानसभेचे अध्यक्षपद एक ते दोन दिवसांपेक्षा अधिक काळ रिक्त राहिलेले नाही. सध्या मात्र तीस दिवस झालेत मात्र नवीन अध्यक्षांच्या निवडणुकीबाबत काहीही निर्णय झालेला नाही. बहुमताच्या जोरावर काहीही रेटून नेऊ नका. तसे करता येणार नाही. 

मुनगंटीवार म्हणाले, 17 डिसेंबर 1980 या दिवशी शरद पवार यांचे सरकार केंद्र शासनाने बरखास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू केली होती. यावेळी अशीच कारमे दिली होती. त्यात घटनात्मक शासन व्यवस्था अस्तित्वात नसने, घटनेतील तरतुदींची पायमल्ली झाले ही कारणे दिली होती. राज्य सरकार जे करते आहे, ती गुन्हेगारी आहे. राज्यघटनेची गुन्हेगारी आहे. संविधानातील ही 57 वी चुक आहे. घटनेतील 352, 353, 360 या नियमांची पायमल्ली होत आहे. भारतरत्न डॅा बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेतील नियमांची पायमल्ली केली जात आहे. हे आम्ही सहन करणार नाही. अशा चुका करुन अध्यक्षांच्या रिक्त पदांबाबत गॅप ठेऊ नका, आणि राष्ट्रपती राजवट लागू झाली तर रडू नका.

मुनगंटीवार यांच्या या विधानानंतर सभागृहात नाना पटोले यांनीही बोलण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ गोंधळ झाला.
.... 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

टॅग्स

Incidents, राष्ट्रपती, Sudhir Mungantiwar, Government, Mumbai, Sharad Pawar, Nana Patole