पुणतांबा शेतकऱ्यांचे राज ठाकरेंकडे गाऱ्हाणे - Puntamba Farmers Met Raj Thakre | Politics Marathi News - Sarkarnama

पुणतांबा शेतकऱ्यांचे राज ठाकरेंकडे गाऱ्हाणे

सुचिता रहाटे
मंगळवार, 6 जून 2017

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी शेतकरी संपाला पाठींबा असल्याची आपली भूमिका स्पष्ट केली होती. शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळून शेतकरी कर्ज व शेतीमालाच्या हमीभावासाठी मनसे पक्ष जातीने लक्ष देईल. तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारवर दबाव टाकेल. असे आश्वासन राज ठाकरेंनी संपकरी शेतकऱ्यांना दिले.

मुंबई - राज्यातील शेतकरी संपाचा आज(६जून) सहावा दिवस असून दिवसेंदिवस या आंदोलनाचे लोण संपूर्ण राज्यात पसरत आहे. पुणतांब्यातील जेष्ठ शेतक-यांनी आज मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची कृष्णकुंज निवासस्थानी भेट घेऊन महाराष्ट्रातल्या शेतक-यांच्या व्यथा मांडल्या. एकीकडे शिवसेनेने या संपाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मनसे देखील संपात उडी घेईल. असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

आज झालेल्या भेटीच्या वेळी  मनसे नेते बाळा नांदगांवकर, अनिल शिदोरे, अविनाश अभ्यंकर तसेच पुणतांब्यातील शेतकरी बांधव मुरलीधर थोरात, बबनराव धनवटे, शांतीलाल भाटी, राजेश लुटे, गणेश जाधव आदी उपस्थित होते..

मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी शेतकरी संपाला पाठींबा असल्याची आपली भूमिका स्पष्ट केली होती. शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळून शेतकरी कर्ज व शेतीमालाच्या हमीभावासाठी मनसे पक्ष जातीने लक्ष देईल. तसेच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारवर दबाव टाकेल. असे आश्वासन राज ठाकरेंनी संपकरी शेतकऱ्यांना दिले. पक्षाच्या भविष्यातील वाटचालीच्या दृष्टीने ही भेट तितकीच महत्वाची समजली जात आहे.

मुंबईवर शेतकरी संपाचा फारसा प्रभाव दिसत नसला तरीही राज्यभरात संपाचे तीव्र पडसाद उमटताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्यासोबतची ही भेट महत्वाची समजली जात होती. यापूर्वीच राज ठाकरेंनी संपाबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली होती. पण या भेटीनंतर शेतकऱ्यांची भूमिका काय असेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख