माैन वृताने  शेतकरी संपाची सांगता ;  पुणतांब्यात  दुध संकलन सुरू  - Puntamba farmers call back strike | Politics Marathi News - Sarkarnama

माैन वृताने  शेतकरी संपाची सांगता ;  पुणतांब्यात  दुध संकलन सुरू 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 7 जून 2017

आमचा हेतू निःस्वार्थी

आम्ही प्रारंभीच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यांची भूमिका जाणून घेतलीआश्वासनापलिकडे ते काहीच देण्यास तयार नव्हतेशेतकऱी बांधवाचे नुकसान होऊ नये म्हणून प्रारंभी मी संप मागे घेण्याचे जाहीर केलेमात्र इतरांनी मलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून आंदोलन चालू ठेवलेआता मीही माझे कर्तव्य करणार आहेशेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढत राहणारमाझा हेतू निःस्वार्थी आहेराजकारणविरहीत आहेअसे डाॅधनवटे यांनी स्पष्ट केले.

नगर :  गेले सात दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी संपाची सांगता आज माैन वृत करून झालीशेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार आता बहिरे झाले आहेकितीही ओरडलेमोर्चे,आंदोलने केलीसर्व प्रकारचे मार्ग अवलंबिलेपण न्याय मिळत नाहीसरकारच बहिरे झाल्याने आता आम्ही मुके होऊन निषेध करीत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहेत्यामुळे पुणतांब्यात आजपासून दुध संकलन सुरू झाले.

शेतकरी संपाची पहिली सभा तीन एप्रिल रोजी झालीपंचवीस ते तीस मे दरम्यान धरणे आंदोलने झालीविविध राजकीय मंडळींनीही संपाला पाठिंबा दिलाकिसान क्रांतीमार्फत केलेल्या आवाहनानुसार एक जून पासून शेतकरी संपावर गेलाआंदोलनात राज्यभरातून शेतकरी सभा झाल्यासंप काळात शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झालेशेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य होईपर्यंत शेतकरी शांत बसणार नाहीतअसे आंदोलनाचे एक नेते डाॅधनंजय धनवटे यांनी सरकारनामाशी बोलताना सांगितले.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आम्ही कोणतेही राजकारण न आणता लढलोपण राजकीय मंडळींनी आमच्यात फुट पाडलीसंपूर्ण राज्यात संप यशस्वी होऊनही पदरात काही पडता दिसत नाही.सरकार फक्त आश्वासनांची खैरात करतेशेतकऱ्यांच्या नेत्यांमध्येच एकी राहिली नाही.राजकीय हस्तक्षेप वाढलासत्ताधाऱी सरकारने हे आंदोलन गुंडाळलेशेतकऱ्यांनी कितीही आगपाखड केलीतरी सरकार एेकण्याच्ाय मनःस्थितीत नाहीबहिरे झालेल्या सरकारला आता मुके होऊन उत्तर देऊअसे डाॅधनवटे म्हणालेआता यापुढे नाशिक येथील सुकाणू समिती काय निर्णय घेईलत्यानुसारच आंदोलने केले जातील.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख