निष्ठावंतांसोबत भाजपने विश्वासघात केल्याची ही शिक्षा आहे  !

आयात उमेदवार शंकर दावानी यांना उमेदवारी दिल्याने मतदानाच्या प्रक्रियेतून पाय काढला असे राजकुमार यांनी सांगितले.
BJP Symbol
BJP Symbol

उल्हासनगर :गेल्या अनेक वर्षांपासून भाजपशी एकनिष्ठ असलेल्या निष्ठावंतांना डावलून आयत्या क्षणी राष्ट्रवादीतून आयात केलेल्याला परिवहन सभापतीची उमेदवारी दिल्याने मतदान प्रक्रियेतून पाय काढला, असे परखड मत परिवहन सदस्य राजकुमार सिंग यांनी व्यक्त केले आहे. 


विशेष म्हणजे आपण मतदानात भाग घेतला नसल्याने भाजपा आणि महाविकास आघाडी यांचे समान संख्याबळ झाल्यावर काढण्यात आलेल्या चिठ्ठीनेही भाजपाला साथ दिली नाही. ही निष्ठावंतांसोबत विश्वासघात केल्याची शिक्षा आहे, असा गौप्यस्पोट परिवहन सदस्य आणि भाजपाचे मंडळ अध्यक्ष राजकुमार सिंग यांनी केला आहे.


उल्हासनगर महापालिका परिवहन समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत मतदान न करता पळ काढणारे राजकुमार सिंग यांच्यावर पक्ष कोणती कारवाई करणार याकडे लक्ष लागले असतानाच, मतदानातून पाय का काढला याविषयी राजकुमार यांनी भाजपा पक्ष श्रेष्ठींकडे मन मोकळे करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या 28 वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ असून मंडळ अध्यक्ष पदाची जबाबदारी हाताळत आहे. परिवहन सभापती पदासाठी उमेदवारी मिळावी, अशी विनंती पक्षाकडे केली होती. मात्र राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश करणाऱ्या शंकर दावानी यांना उमेदवारी देण्यात आली. त्यास विरोध केला.

माझ्याऐवजी परिवहनमध्ये सदस्य असलेले मनोहर खेमचंदानी, बच्चन तोमर यांच्यापैकी कुणालाही उमेदवारी दिली असती तर विरोध केला नसता, पण आयात उमेदवार शंकर दावानी यांना उमेदवारी दिल्याने मतदानाच्या प्रक्रियेतून पाय काढला असे राजकुमार यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com