Aditya Tkackray
Aditya Tkackray

पुणेकरांनी माझे ते विधान विनोदाने घ्यावे : आदित्य ठाकरे

....

पुणे : 'आफ्टरनून लाईफ संदर्भामध्ये मी केलेले विधान पुणेकर विनोदाने घेतील, अशी अपेक्षा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केली. 

पुणे इंटरनॅशनल सेंटर ने आयोजित केलेल्या कार्यक्रमानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. पुण्यात नाईट लाईफ सुरू करण्यापूर्वी आफ्टरनून लाईफ सुरू करण्याची गरज आहे, असे ठाकरे मुंबईत म्हणाले होते. या बाबत खुलासा करताना ते वक्तव्य विनोदाने घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. 

कोणत्याही शहरातील वाहतुकीची कोंडी सुटण्यासाठी मेट्रो आणि बीआरटी यासारख्या वाहतूक व्यवस्था अत्यावश्यक असल्याचा पुनरुच्चार ठाकरे यांनी केला.  पुण्यातील नदीकाठ विकसन प्रकल्पाबाबत  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले. सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेसचे नेते  अशोक चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याबाबत ठाकरे यांनी बोलणे टाळले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com