Politics : बारामतीतून 14 जिल्हा परिषद सदस्य निवडून आणणार; शिवतारेंनी फुंकले निवडणुकीचे रणशिंग

Politics : शिवतारे यांनी रविवारी खेड-शिवापूर येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला
Vijay Shivatare
Vijay ShivatareSarkarnama

खेड-शिवापूर : "बारामती मतदार संघात येणारा प्रत्येक प्रकल्प बारामतीला पळविला जात आहे. विद्यमान खासदारांच्या या कारभाराला जनता कंटाळली असून बारामती मतदार संघात आता जनताच बदल घडवेल," असे मत माजी राज्यमंत्री विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांनी येथे व्यक्त केले. शिवतारे यांनी रविवारी खेड-शिवापूर येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी शिवतारे म्हणाले, "बारामती मतदार संघात केवळ बारामतीतील मोजक्या लोकांचा विकास झाला. इतर भाग विकासापासून कायम उपेक्षित राहिला आहे. या मतदार संघात येणारा प्रत्येक प्रकल्प बारामतीला पळविण्यात येत आहे. या कारभाराला जनता कंटाळली असून आता या मतदार संघात जनताच बदल घडवेल'', असं ते यावेळी म्हणाले.

Vijay Shivatare
Konkan News : कोकणात ठाकरे गटाची पडझड थांबेना; हजारो शिवसैनिक शिवबंधन तोडून भाजपात जाणार

''तसेच येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत बारामती (Baramati) मतदार संघात यावेळी कोण उमेदवार द्यायचा? हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि दिल्लीतील भाजपचे (BJP) वरिष्ठ नेते ठरवतील. पण यावेळी आम्ही बारामती मतदार संघात 14 जिल्हा परिषद सदस्य आणि 28 पंचायत समिती सदस्य निवडून आणणारच'', असं विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Vijay Shivatare
Sanjay Raut on Hindu March : ... म्हणूनच शिवसेनाभवनपुढं आक्रोश; संजय राऊत यांनी सांगितलं कारण

''गुंजवणी प्रकल्पाचे काम लवकर सुरु झाले तर या प्रकल्पाची किंमत वाढणार नाही. शिवाय प्रकल्प वेळेत पूर्ण होईल. रिंगरोडसाठी जमीनीचे मूल्यांकन किंवा इतर काही अडचणींबाबत लवकरच शेतकऱ्यांची बैठक आयोजित केली जाईल. शिवापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजाराचा प्रश्न येत्या महिनाभरात मार्गी लावण्यात येईल'', असे शिवतारेंनी यावेळी सांगितले.

Vijay Shivatare
Pune By-Election : कसबा-चिंचवडमध्ये भाजपची सावध खेळी : आघाडीनंतरच उमेदवार जाहीर करणार!

दरम्यान, यावेळी शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अमोल पांगारे, डॉ.ममता शिवतारे-लांडे, अमोल कोंडे, अण्णा दिघे, राजू सट्टे, कैलास ओंबळे आदी यावेळी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com