प्रकल्प गुजरातला गेल्याचा जाब मुख्यमंत्री शिंदेंना चार हजार पत्राव्दारे विचारला

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने (NCP) आज राज्य सरकारच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन केले
Youth Nationalist Congress protest
Youth Nationalist Congress protestsarkarnama

पिंपरी : दोन लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक गुंतवणुकीचे दोन लाख रोजगाराचे तीन मोठे प्रकल्प तीन महिन्यात महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आले आहे. त्याच्या निषेधार्थ पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने (NCP) आज राज्य सरकारच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन केले.

गुजरात विधानसभेची आगामी निवडणूक जिंकून देण्यासाठी मोदींना मदत म्हणून हे प्रकल्प राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने गुजरातला दिल्याचा हल्लाबोल युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष इम्नान शेख यांनी यावेळी केला. शेख आणि राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन झाले.

Youth Nationalist Congress protest
धनंजय मुंडेंना मी सोडणार नाही : बीडमध्ये घर खरेदीनंतर करुणा शर्मांचे पुन्हा आव्हान

माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, माजी नगरसेवक अरुण बोराडे, प्रकाश सोमवंशी, राजू बनसोडे, राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सचिव डॉ अरुण शिंदे व असंख्य युवक कार्यकर्ते त्यात सामील झाले होते. महाराष्ट्राचे गद्दार..गुजरातचे वफादार..!, गुजरात तुपाशी..महाराष्ट्र उपाशी..!, गद्दारांना ५० खोके...महाराष्ट्राला धोके.!द्या आमच्या रोजगाराची हमी..बंद करा गुजरातची गुलामी..!अशी जोरदार घोषणाबाजी त्यांनी यावेळी केली.

शिंदे-फडणवीस सरकार महाराष्ट्रासाठी नाही, तर गुजरातसाठी काम करत आहे, अशी घणाघाती टीका शेख यांनी यावेळी केली. गेल्या तीन महिन्यात महाराष्ट्रातील साडेतीन लाख रोजगार निर्मितीचे तीन मोठे प्रकल्प नेमके गुजरातमध्ये का पाठवले.? इतर राज्यात का गेले नाहीत? अशी विचारणा त्यांनी केली.

वेदांत फॉक्सकाँन, बल्क ड्रग पार्क व आता टाटा एअरबस हे तिन्ही प्रकल्प गुजरातची विधानसभा निवडणूक मोदींनी जिंकण्यासाठी मदत म्हणून गुजरातला स्थलांतरीत केल्याचा आरोप त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला. तरुणांना बेरोजगार करून त्यांना भोंगे, दहीहंडी, हनुमान चालीसा, दिवे फटाक्यांमध्ये अडकवून तुम्ही सोयीचे राजकारण करत आहात, अशी तोफ त्यांनी डागली.

Youth Nationalist Congress protest
वाचून का होईना मुख्यमंत्र्यांनी माहिती द्याला हवी होती; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना चिमटे

"शिंदे फडणवीस सरकार हे गद्दारांच सरकार राज्यात रोजगार निर्मिती करायचे सोडून राज्यातील युवकांचा रोजगार गुजरातला पळवत आहे, असे आल्हाट म्हणाल्या. तर, इतक्या मोठ्या प्रमाणावरील रोजगार गुजरातला देऊन खोके सरकारने राज्यातील तरुणांवर भीक मागायची वेळ आणल्याची कडवट टीका अरुण बोराडे यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in