'तुमचे नगरसेवक पद घालवतो..' २५ लाखांची खंडणी : आरटीआय कायद्याचा गैरवापर ऐरणीवर

Extrortion : नगरसेविकेच्या पतीकडे तब्बल २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
Extrortion
ExtrortionSarkarnama

पुणे : माहिती अधिकार कार्यकर्त्याने कायद्याचा गैरवापर करून खंडणी उकळण्याचा प्रकार उघडकील आले आहे. बेकायदेशीर बांधकाम केल्याचा आरोप करत, एका नगरसेविकेला थेट नगरसेवकपद घालविण्याची धमकी देत, एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने (आरटीआय) नगरसेविकेच्या पतीकडे तब्बल २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित माहिती अधिकार कार्यकर्त्याविरुद्ध विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जितेंद्र अशोक भोसले (रा. विमाननगर) असे गुन्हा दाखल केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी एका नगरसेविकेच्या पतीने विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. भोसले याच्याविरुद्ध यापूर्वीच खंडणीचे ३ व इतर ३ असे गुन्हे दाखल आहेत. भोसले याने फिर्यादी यांच्या मिळकतीमध्ये बेकायदेशीर बांधकाम करीत असल्याचे कारण सांगून त्याबाबत पुणे महानगरपालिका व पीएमआरडी येथे त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात यावे, यासाठी अर्ज केली होती. याप्रकरणी तपास होऊन कोणतेही बेकायदेशीर बांधकाम झाले नसल्याचा निर्वाळा पीएमआरडीने दिला होता. तरीही "महापालिका निवडणुकीत तुमची व तुमच्या पत्नीची सोशल मिडियाच्या माध्यमातून बदनामी करेल," अशी भीती दाखवून भोसले याने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती.

Extrortion
अखेर २० वर्षानंतर नगरमध्ये पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राची पायाभरणी

२३ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष भेटून त्याने तब्बल २५ लाख रुपये मागितले होते. हा प्रकार वारंवार होत असल्याने, अखेर नगरसेविकेच्या पतीने विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र, त्यावर कसलीही कारवाई झाली नव्हती. त्यानंतर त्यांनी खंडणी विरोधी पथकाकडे तक्रार केली. त्यांच्या अर्जाची चौकशी करुन विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा तपास खंडणी विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे करीत आहेत.

Extrortion
देवापेक्षा जास्त विश्वास शिंदे, फडणवीसांवर, मराठा समाजाला लवकरच आरक्षण..

या अर्जाची तपासणी होऊन कोणतेही बेकायदेशीर बांधकाम झाले नसल्याचा निर्वाळा पीएमआरडीने दिला होता. तरीही 'महापालिका निवडणुकीत तुमची व तुमच्या पत्नीची सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी करेल' अशी भीती दाखवून भोसले याने त्यांच्याकडे पैशांची मागणी केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in