महाआघाडीचे तरुणतुर्क आमदार महाराष्ट्राच्या दौऱ्यावर; सरकारची प्रतिमा उजळवणार

महाविकास आघाडीतील तरूण आमदारांनी घेतली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट
Sharad Pawar, Rohit Pawar, Atul Benke
Sharad Pawar, Rohit Pawar, Atul Benkesarkarnama

पुणे : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) सरकारमधील तरुण आमदार महाराष्ट्र मोहिमेवर निघणार आहेत. सरकारने केलेल्या दोन वर्षातील कामगिरीचे प्रगतीपुस्तक ते नागरिकांसमोर सादर करणार आहेत.

या मोहिमेतील निवडक सरदार आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी गुरुवारी (ता.17) भेट घेऊन मार्गदर्शन घेतले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar), अतुल बेनके (Atul Benke), इंद्रनील नाईक, आशुतोष काळे, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare), काँग्रेसचे आमदार धिरज देशमुख, ऋतुराज पाटील तर शिवसेनेचे आमदार योगेश कदम उपस्थित होते.

Sharad Pawar, Rohit Pawar, Atul Benke
विरोधी पक्षनेत्यांना धक्का! इनकम टॅक्सच्या छाप्यांची धमकी दिल्याने हक्कभंग दाखल

काही निवडक तरुण आमदारांसोबत समन्वय साधत महाराष्ट्र मोहिमेची आखणी करणार आहेत. या मोहिमेत सर्व आमदार एकमेकांच्या मतदारसंघात त्यांनी केलेल्या विविध नाविन्यपूर्ण आणि वैशिष्ठ्यपूर्ण कामांबरोबरच सरकारने केलेल्या कामगिरीचे प्रगतीपुस्तक सादर करणार आहे. अशी माहिती एका आमदारांनी 'सरकारनामा'शी बोलताना दिली.

Sharad Pawar, Rohit Pawar, Atul Benke
महाराष्ट्र काँग्रेसवर विदर्भाच वर्चस्व; मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राला ठेंगा

सरकारच्या वतीने सध्या दोन वर्षे जनसेवेची...महाविकास आघाडीची हि मोहिम समाजमाध्यमांवर राबविली जात आहे. हिच मोहिम तरुण आमदार एकमेकांच्या मतदारसंघात जाऊन सरकारचे काम तळागाळात पोहचवणार आहेत. याचे सुक्ष्म नियोजन सध्या सुरु आहे. या मोहिमेला गुढीपाडव्याला प्रारंभ होण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडुन योगेश कदम यांच्यासह युवासेना प्रमुख आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेही या मोहिमेत सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com