व्हॉटसअप चॅटींगद्वारे त्रास देणं तरुणाला पडलं चांगलच महागात; महिलेनं शिकवला धडा...

Crime : पोलिसांनी महिलेस अटक केली.
Crime News
Crime News sarkarnama

पुणे : पुण्यात एका सराईत गुन्हेगाराच्या पत्नीला व्हॉटस्‌अपद्वारे चॅटींग करीत तिला मानसिक त्रास देणाऱ्या तरुणाला चॅटींगचा प्रकार चांगलाच महागात पडला आहे.

संबंधित महिलेने त्रास देणाऱ्या तरूणाला धडा शिकवण्यासाठी तिच्या साथीदारांच्या मदतीने चॅटींगद्वारे त्रास देणाऱ्या तरुणाच्या गुप्तांगावर वार केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

दरम्यान, भारती विद्यापीठ पोलिसांनी महिलेस अटक केली असून. ही घटना शनिवारी (ता.12 नोव्हेंबर) आंबेगाव बुद्रूक परिसरात घडली आहे. (Crime, pune News )

Crime News
खुनाचा गुन्हा चालला असता पण ३५४ गुन्हा मान्य नाही

विनायक लोंढे (वय-30) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विनायक काही दिवसांपासून एका महिलेसोबत व्हॉटसऍपवर सातत्याने चॅटिंग करीत होता. संबंधित महिलेचा पती सराईत गुन्हेगार होता, त्याचा खुन झाला आहे. त्यानंतर महिलेची एका तरूणासोबत मैत्री झाली होती. त्यानंतरही विनायक वारंवार तिला मेसेज करुन मानसिक त्रास देत होता.

Crime News
आव्हाड प्रकरणात नवा ट्विस्ट; आरोप करणाऱ्या महिलेविरोधात अॅट्रॉसिटीची तक्रार

त्यामुळे महिलेचा त्याच्यावर राग होता. त्यातुनच महिलेने शनिवारी त्यास आंबेगाव बुद्रुक परिसरातील एका मंदीरालगतच्या मैदानावर बोलावून घेतले. त्यावेळी महिलेने तिचा मित्र व त्याच्या तीन साथीदारांनाही तेथे बोलावून घेतले होते. त्यांनी विनायकला मारहाण करीत त्याच्या डोक्‍यात धारदार शस्त्राने वार केले. त्यानंतर त्याच्या गुप्तांगावरही वार केले. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून या घटनेनंतर त्यांनी तरुणास जीवे मारण्याची धमकी देत सोडून दिले. या घटनेची फिर्याद दाखल झाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी संबंधित महिलेस तत्काळ अटक करण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in