दहशतवादी संघटनेशी संबंध; पुण्यातून एकाला अटक

Pune Crime news| ISIS terrorist organization| भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी समविचारी लोकांचा गट तयार करणे, त्यांच्या पाठिंब्याने इसिसच्या विचारसरणीचा प्रचार करणे, हे काम या गटाचे होते.
 Young man arrested in Pune on suspicion of having links with ISIS terrorist organization
Young man arrested in Pune on suspicion of having links with ISIS terrorist organization

पुणे : ‘इसिस’ (ISIS) या दहशवादी संघटनेसोबत संबंध असल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) वानवडीतून एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. तल्हा लियाकत खान (वय ३८) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने पुण्यातील वानवडी परिसरात एका घरावर छापेमारी केली. या कारवाईत त्याच्या घरातून कागदपत्रे आणि काही इलेक्ट्राॅनिक्स वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत. (Latest crime news update in Pune)

तल्हा खानचे इसिसशी संबंध असल्याचा संशयावरून एनआयएच्या पथकाने त्याच्या घरावर छापेमारी केली. या कारवाईत खानच्या घरातून कागदपत्रे आणि इलेक्ट्राॅनिक्स वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. इसिस देशभरात घातपात करण्याच्या तयारीत आहे. यातूनच विविध भागात छापेमारी सुरु आहे. त्यातूनच ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आल्याचे वृत्त स्थानिक वर्तमानपत्रांनी दिले आहे.

 Young man arrested in Pune on suspicion of having links with ISIS terrorist organization
Raj Thackeray Live : मुख्यमंत्र्यांची तब्येत चांगली नसल्याने निवडणुका पुढे ढकलल्या..

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन- तीन दिवसापासून एनआयएचे पथक पुण्यात या प्रकरणाचा तपास करत आहे. एनआयएनं मार्च 2020 मध्ये हानझीब वानी आणि हिना बशीर बेग या काश्मिरी दाम्पत्याला अटक केली होती. त्यांची चौकशी केल्यानंतर आणखी चौघांना अटक करण्यात आली. त्यानंतर संशयित तल्हा खान त्यांच्या संपर्कात असल्याचाही एनआयएला संशय आला. या संशयावरुन आता पर्यंत देशाच्या वेगवेगळ्या भागातून एनआयएने नबील सिद्दीक खत्री, अब्दुर रहमान ऊर्फ डाॅ. ब्रेव्ह, अब्दुला बासित, सादिया अन्वर शेख यांना अटक केली, या सहा जणांच्या विरोधात एनआयएने न्यायालयात या सर्वांच्या विरोधात दोषाराेपपत्र दाखल केले आहे.

इसिससाठी काम करणाऱ्यासाठी एका सेलची स्थापना करून त्याद्वारे भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी समविचारी लोकांचा गट तयार करणे, त्यांच्या पाठिंब्याने इसिसच्या विचारसरणीचा प्रचार करणे, हे काम या गटाचे होते. त्याचबरोबर शस्त्रे गोळा करण्यासाठी, निधी उभारण्यासाठी आणि आत्मघातकी कारवाई घडवून आणण्याचे त्यांचे उद्दिष्ट असल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com