Pune DPC Meeting : भाजप-शिंदे गटाला किती निधी द्यायचा ते तुम्ही ठरवा; पण आमच्याही निधीचे नियोजन करा : अजितदादांसह विरोधी आमदार आक्रमक

पुणे जिल्ह्यात एकूण २१ विधानसभेच्या जागा आहेत. त्यापैकी १३ जागा या विरोधी पक्षाच्या, तर उर्वरीत जागा या सत्ताधारी पक्षाच्या आहेत.
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama

पुणे : सत्ताधाऱ्यांनी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाला किती निधी द्यायचा, ते तुम्ही ठरवा; परंतु इतर आमदारांनाही निधी देण्याचे नियोजन करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह विरोधी आमदारांनी आज आक्रमकपणे केली. (You decide how much to fund the BJP-Shinde group; But give us funds too: Ajit Pawar)

पुणे (pune) जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक आज झाली. या बैठकीनंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी माध्यमांशी संवाद साधला. पुणे जिल्हा नियोजन बैठकीला अनेक वर्षांनंतर शरद पवार पहिल्यांदा आल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून आल्याचे सांगितले.

Ajit Pawar
Congress Leader News : गाडीची स्मशानभूमीत पूजा...२०२३ क्रमांक अन्‌ कर्नाटकात सत्ता : काँग्रेसच्या बड्या नेत्याचा संकल्प अखेर पूर्ण

या बैठकीत पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका मांडली. पुणे जिल्ह्यात एकूण २१ विधानसभेच्या जागा आहेत. त्यापैकी १३ जागा या विरोधी पक्षाच्या, तर उर्वरीत जागा या सत्ताधारी पक्षाच्या आहेत. यामध्ये निधीचे वाटप होताना काही आमदारांवर अन्याय झाला आहे. ही गोष्ट पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar
Sharad Pawar News : पुण्याच्या डीपीसी बैठकीला शरद पवारांची हजेरी : बैठकीत कुठल्याही विषयावर भाष्य नाही

सत्ताधारी पक्षाने भाजप आणि शिंदे गटाला किती निधी द्यायचा, हे तुम्ही ठरवा, परंतु इतर आमदारांनाही निधी देण्याचे नियोजन करावे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे त्याची दखल घेतली असून यातून मी मार्ग काढतो आणि कुणाची तक्रार येणार नाही, याची खबरदारी मी घेतो, असे चंद्रकांतदादांनी मला सांगितले. त्यामुळे यापुढे योग्य ते नियोजन होईल, अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली.

Ajit Pawar
D.K. Shivakumar News: ‘माझ्या भावाला मुख्यमंत्री व्हायचं होतं, हायकमांडच्या निर्णयावर समाधानी नाही’ : डीकेच्या खासदार भावाची प्रतिक्रिया

अजित पवार म्हणाले की, राज्यात कंत्राटदारांची जवळपास एक लाख सात हजार कोटींची बिले थकीत आहेत. राज्यात आर्थिक ओढाताण असल्याने ही बिलं थकली आहेत का? याबद्दलची ठोस माहिती मिळालेली नाही. ही अडचण सोडविण्याची विनंती सर्वांच्या वतीने करण्यात आली. काही आमदारांच्या तक्रारीनुसार इतर सदस्यांची नावे टाकून काही कामे पूर्ण केली असल्याचे सांगण्यात येत आहे. पण, ज्याने काम केले, त्या योग्य सदस्याला त्याचा सन्मान मिळायला हवा, अशी मागणीही केली.

Ajit Pawar
Amol Mitkari News : अमोल मिटकरींनाही व्हायचंय खासदार : अकोल्यातून लढण्याची व्यक्त केली इच्छा

पिण्याचे पाणी, कचरा, जलपर्णी, रस्त्यांची कामे, वीजेची कामे तातडीने मार्गी लागण्यासाठी त्यासाठी देण्यात येणाऱ्या निधीमध्ये वाढ करणे जरूरी आहे. तसेच जिल्ह्यातील पोलिस विभागाच्या कामांना योग्य निधी देऊन तेथील फर्निचरचे काम पूर्ण करून दिले, तर त्या वास्तू वापरात येऊ शकतील. याकडे सरकारने लक्ष द्यावे अशी बैठकीत चर्चा झाली. यासाठी पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही या बाबींचा पाठपुरावा करू, असेही त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com