Vasant More : आमदारांच्या सरणाची राख निवली नाही तोच तुम्हाला मतांची चिंता; वसंत मोरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा

Corporation Election : वर्षभरापासून महानगरपालिकेच्या निवडणुका रखडल्याने उपस्थित केले प्रश्न
Vasant More
Vasant MoreSarkarnama

Vasant More News : कसब्यातील आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांचे निधन झालं. त्यामुळं दोन्ही ठिकाणी आता पोटनिडणुका लागल्या आहेत. ही निवडणूक त्यांच्या निधनानंतर एका महिन्यात लागली. त्यामुळे राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या होत्या. आता तोच मुद्दा धरून पुणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

याबाबत वसंत मोरे यांनी (Vasant More) फेसबुक पोस्ट करीत आपली नाराजी व्यक्त केली. तसेच शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारचा निवडणुकीमागील हेतूबाबतही शंका उपस्थित केली.

ते म्हणाले की, "गेल्या वर्षापासून पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत प्रशासक आहे. लोकप्रतिनिधी नसल्याने नागरिकांची अनेक कामे रखडलीत. त्यामुळं वर्षभरात महानगरपालिकेच्या निवडणुका होणं अपेक्षीत होतं. त्या झाल्या नाहीत. मात्र विधानसभेच्या पोटनिवडणुका लगेच कशा काय घेता?".

Vasant More
Neelam Gorhe : ठाकरे गटाच्या नीलम गोऱ्हेंचा धक्कादायक खुलासा; म्हणाल्या, आदित्य ठाकरेंच्या आजच्या सभेतही हल्ला...''

वसंत मोरे फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले, "माझा शिंदे-फडणवीस सरकारला एक प्रश्न आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील भाजपच्या दोन आमदारांचा मृत्यू झाला. त्यांच्या सरणाची राख अजून शांत झाली नसेल. तुम्हाला मात्र तुमच्या मतांची चिंता. त्यामुळं लगेच पोटनिवडणुका घेतल्या."

वर्षभरापासून महानगरपालिकेच्या (Pune Corporation) निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे शहरातील विकासकामे रखडल्याचा आरोपही मोरे यांनी केला. ते म्हणाले, "एक वर्षापासून शहराला कोणताही लोकप्रतिनिधी (नगरसेवक) नाही. प्रशासनाने शहराचे वाटोळे लावले आहे. विकासकामे ठप्प झाली आहेत. निधी नसल्यामळे नागरिकांना तोंड दाखवू वाटत नाही."

Vasant More
Ajit Pawar News : अजितदादांनी उमेदवारांचे टेन्शन हलके केले; चिंचवड-कसबा पोटनिवडणुकीबाबत स्पष्टच सांगितले..

शहरातील विकासकामे रखडल्याची खंत व्यक्त करून मोरे यांनी आमदार-खासदारांनाही आव्हान केलं. मोरे म्हणाले, "पुण्यातील आमदार, खासदारांनी जरा आमच्या चपलेत पाय घालून पाहावे", असं म्हणत मोरे यांनी काम करता येत नसल्याची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला.

Vasant More
Jayant Patil News : राज्याच्या अर्थसंकल्पात फक्त पोकळ घोषणाच असतील..

यानंतर राज्य सरकारलाही टोला लगावला आहे. मोरे म्हणाले, "जर कोणत्या पक्षाला सहनुभुती मिळेल म्हणून जर निवडणुका टाळत असताल तर तुमचा पराभव निश्चित समजा. कारण जो मनातून हारतो तो रणात काय जिंकणार...", अशी भावना मोरे (Vasant More) यांनी फेसबुकच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com