योगेश ससाणे राष्ट्रवादी सोडणार; शिंदे गटात जाणार ?

Deepak Kesarkar : ससाणे हे हमखास भाजपच्या तंबुत जाणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात होते.
Deepak Kesarkar,
Deepak Kesarkar, Sarkarnama

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाचे (BJP) कमळ हाती घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या माजी नगरसेवक योगेश ससाणेंना (Yogesh Sasane) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडूनही पक्ष प्रवेशाची 'ऑफर' असल्याचे स्पष्ट आहे. शिंदे गटाचे बडे नेते आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांची भेट घेऊन ससाणेंनी आपल्या राजकीय भवितव्याची चाचपणी केल्याचे समजते.

या दोघांच्या भेटतील तब्बल तासाभराच्या चर्चेने ससाणे पुढच्या महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून नव्या राजकीय वाटेवर दिसण्याची चिन्हे आहेत. परंतु, राजकीय नव्हे; तर शालेय विद्यार्थी आणि पालकांच्या काही मागण्यांबाबत केसरकरांची भेट घेतल्याचे सांगून ससाणे हे आपली राजकीय चाल लपविण्याचा प्रयत्न करीत आहेत. भाजप नेत्यांसोबतचेही 'डील' तूर्त तरी मान्य न केलेले ससाणे हे नेमके कोणाकडे वळणार, याची उत्सुकता आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांतील गटबाजीला वैतागूनच ससाणे हे पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत.

Deepak Kesarkar,
शिवसेना फुटीमागचे ‘चाणक्य’ अमित शहांच्या मुलाला नार्वेकरांनी दिल्या शुभेच्छा!

राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून राजकारण करणाऱ्या दिवंगत दत्तोबा ससाणे यांच्यानंतर योगेश ससाणे हे महापालिकेच्या राजकारणात उतरले. परंतु, विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीनंतरची भाजपची हवा असल्याने ससाणे हे या पक्षात गेले. भाजपमधील अडथळ्यांत राजकीय भवितव्य नसल्याची खात्री करून ससाणेंनी महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीआधी स्वगृही म्हणजे, राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. या निवडणुकीत ते नगरसेवक झाले आणि महापालिकेच्या सभागृहात नेहमीच आक्रमक राहून, संघटनेतील प्रमुख चेहरा होण्याची धडपड त्यांनी केली.

या काळात स्थायी समिती, महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदावरही त्यांनी दावेदारी केली. परंतु, स्वः पक्षातील संघर्षात ससाणे कमी पडले आणि महापालिकेच्या राजकारणातून त्यांच्या पदरात फार काही आलेच नाही. त्यामुळे गेल्या दोन वर्षातील नाराजीतून ते राजकीया नव्या मार्गावर जाण्याच्या हालचालीत पोचले आहेत.

Deepak Kesarkar,
अविश्वासापुढे निष्ठा हरली; ठाणे जिल्हा प्रमुखाने सोडली ठाकरेंची साथ

हडपसरमधून विधानसभेचे तिकिट मिळविण्याच्या अटीवर ससाणे यांनी भाजपच्या काही नेत्यांसोबत चर्चाही केल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर भाजप नेते आणि ससाणे यांच्यात बैठकांचाही कार्यक्रम झाला. त्यानंतरच्या सत्तांतरानंतर ससाणे हे हमखास भाजपच्या तंबुत जाणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात होते. त्यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नसतानाच ससाणे यांनी गुरुवारी केसरकरांची भेट घेतली. या दोघांच्या भेटीत काही मिनिटे राजकीय चर्चा झाल्याचेही समजते.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमधील राजकीय चित्र जाणून घेताना, आगामी निवडणुकांसाठी पुणे शहरात ताकद याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे. पुण्यात या गटाचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या नेतृत्वात काही माजी नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्यासाठी शिंदे गटाचे फिल्डिंग लावली आहे. त्यातूनच ससाणे यांना आपल्याकडे घेऊन हडपसरमध्ये गट विस्तारण्याची शिंदे गटाची रणनीती असावी. दरम्यान, केसरकर यांच्यासोबतच्या भेटीत राजकीय मुद्यांवर चर्चा झालीच नाही. कोरोना काळात शालेय शुल्क माफीबाबत झालेल्या निर्णयांतील त्रुटी आणि त्याचा परिणाम यावरच बोलल्याचे ससाणे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in