दहावी-बारावीचे निकाल लांबणीवर? शिक्षकांच्या भूमिकेने विद्यार्थी टेन्शनमध्ये

SSC-HSC Board Exam| वर्षभर ऑनलाईन माध्यमातून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचं शिक्षण झालं. मात्र परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं झाल्या.
दहावी-बारावीचे निकाल लांबणीवर? शिक्षकांच्या भूमिकेने विद्यार्थी टेन्शनमध्ये

पुणे : दोन वर्षांच्या कालावधीनंतर कोरोना विषाणूचा संसर्ग कमी झाल्यानंतर राज्यात शाळा महाविद्यालये सुरु झाली. वर्षभर ऑनलाईन माध्यमातून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचं शिक्षण झालं. मात्र परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं झाल्या. ऑफलाईन परीक्षा होऊ नये यासाठी काही विद्यार्थ्यांनी आंदोलनही केलं. मात्र यानंतरही राज्यात बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं झाल्या.

त्यानंतर आता विद्यार्थी निकालाची वाट पाहत आहेत. अशातच आता बोर्डाचा निकालही लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दहावी आणि बारावीच्या उत्तर पत्रिका तपासण्यावर विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी बहिष्कार घातल्याने राज्यातील SSC, HSC परीक्षांचे निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

दहावी-बारावीचे निकाल लांबणीवर? शिक्षकांच्या भूमिकेने विद्यार्थी टेन्शनमध्ये
शिवसेना नेत्याशी पंगा महागात! पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची मुदतपूर्व बदली

विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यां पाठपुरावा करूनही त्या पूर्ण न झाल्यामुळे शिक्षकांनी पेपर तपासण्यास नकार दिला आहे. मात्र, शिक्षकांनी विद्यार्थी आणि पालकांना वेठीस धरू नये, असं आवाहन बोर्डाच्या वतीने करण्यात आले होते. बोर्डानेही विनाअनुदानित शिक्षकांची मागणी बोर्डानं राज्य शासनाला कळवली होती. मात्र मागण्या पूर्ण न झाल्याने दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर शिक्षकांनी बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उत्तरपत्रिका वेळेत तपासण्यात उशीर होण्याची शक्यता आहे, परिणामी निकालही उशिरा लागण्याची शक्यता आहे

दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल वेळेतच लागेल, असे चार दिवसांपूर्वीच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं होतं. मात्र, अनेक शिक्षकांनी घातलेल्या बहिष्कारामुळे हा निकाल लांबणीवर पडणार असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. राज्य सरकारने विनाअनुदानित शिक्षकांना 100% सरकारी अनुदान देण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी हा बहिष्कार टाकला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com