पुण्यात साकारणार जागतिक दर्जाचे साखर संग्रहालय

संग्रहालयातून शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना साखर उद्योगातील विविध प्रकल्पांची माहिती उपलब्ध होईल.
Shekhar gaikwad
Shekhar gaikwadSarkarnama

सरकारनामा ब्यूरो

पुणे : साखरेशी संबंधित सर्वकाही अशा स्वरूपाचे जगातील पहिले साखर संग्रहालय पुण्यातील साखर संकुलात साकारणार आहे. संकुलाच्या आवारातील पाच एकर जागेत जागतिक दर्जाचे साखर संग्रहालय उभारण्याचा संकल्न राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी केला आहे

जगभरात ऑस्ट्रेलिया, मॉरिशस आणि जर्मनीमध्ये साखर संग्रहालये आहेत.परंतु ती केवळ मर्यादित स्वरूपात आहेत. मात्र, साखर उद्योगाची संपूर्ण माहिती असलेले हे जगातील पहिलेच साखर संग्रहालय ठरणार आहे.याबाबतचा प्रस्ताव साखर आयुक्त गायकवाड यांनी राज्य सरकारला पाठविला होता. त्याला राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

Shekhar gaikwad
दीड वर्षानंतर : पुण्यात २२ ऑक्टोबरपासून उघडणार नाट्य-चित्रपटगृहांचा पडदा

महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादनात उत्तर प्रदेशानंतर अग्रेसर राज्य आहे.महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये साखर उद्योगाचे महत्त्वाचे स्थान आहे. राज्यातील ऊस आणि साखरेचे उत्पादन, गूळ, खांडसरी साखर तसेच, साखरेपासून बनणारे उपपदार्थ, आसवनी, प्रकल्प, इथेनॉल, कंपोस्ट खत, सहवीज निर्मिती याची माहिती या संग्रहालयातून होणार आहे. हे संग्रहालय शेतकरी, पर्यटक, विद्यार्थी आणि जगभरातील अभ्यासकांना उपयुक्त आणि प्रेरणादायी ठरणार आहे.साखर संग्रहालयाच्या उभारणीसाठी ४० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. साखर आयुक्त कार्यालयाला तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Shekhar gaikwad
हसन मुश्रिफांच्या प्रकरणात सोमय्या केंद्रीय ग्रामविकास सचिवांकडे तक्रार करणार

महाराष्ट्राची साखर उद्योगातील ओळख अधिक तेजस्वी व्हावी, तसेच साखर उद्योगात जागतिक पातळीवर महाराष्ट्राला स्थान मिळवून देण्यासाठी साखर संग्रहालयाची आवश्यकता आहे. या संग्रहालयातून शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना साखर उद्योगातील विविध प्रकल्पांची माहिती उपलब्ध होईल, असे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले.

या संग्रहालयात साखर कारखान्याची मिनी प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. यामध्ये अद्ययावत यंत्रसामग्री उभारण्यात येणार आहे. साखरेची निर्मिती प्रत्यक्षात कशी होते, याचे प्रात्यक्षिक पाहायला मिळेल. तसेच, प्रत्यक्ष समोर तयार झालेल्या ताज्या साखरेची गोडीही पर्यटकांना अनुभवता येणार आहे.

असे असेल साखर संग्रहालय

-गूळ निर्मितीचे सूक्ष्म प्रतिकृतीद्वारे प्रात्यक्षिक

-साखर उद्योगाबाबत डिजिटल प्रदर्शन

-साखर उद्योगात उत्पादित होणाऱ्या सर्व वस्तुंचे विक्री केंद्र

-प्रेक्षागृह, शुगर थीम कॅफे

-सहकारी साखर चळवळीची माहिती देणारे कला दालन

-सुसज्ज ग्रंथालय, ॲम्फी थिएटर

-जागतिक स्तरावरील आणि देशांतर्गत साखरेसंबंधी आवश्यक माहिती

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com