पुण्यात ट्रॅव्हल्स चालकाकडून महिलेवर बलात्कार

Pune Crime news | काही दिवसांपूर्वी एका रिक्षाचालकाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता.
पुण्यात ट्रॅव्हल्स चालकाकडून महिलेवर बलात्कार
Pune Crime news, Pune News

Crime news Pune

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका ट्रॅव्हल्स चालकाने महिलेवर बलात्कार केल्याची माहिती आहे. स्वारगेट परिसरात ट्रॅव्हल्स चालकाने शहरात आलेल्या एका २१ वर्षीय महिलेचे अपहरण करून बलात्कार केला. या मुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. या प्रकरणी चालक नवनाथ शिवाजी भोंग (38) याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत 21 वर्षीय महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. (Pune Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशीम येथून पती, पत्नी कामाच्या शोधात पुण्यात आले होते. शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ते स्वारगेट एसटी स्टँड परिसरात राहण्यासाठी जागा शोधत होते. त्याचवेळी ट्रॅव्हल्स बस चालक आरोपी नवनाथ शिवाजी भोग याने दांपत्याला एवढ्या रात्री कुठे जागा मिळणार, त्यापेक्षा माझ्या बसमध्ये झोपा असं सांगितलं. आरोपीवर विश्वास ठेवून दोघे पती पत्नी बसमध्ये आराम करण्यासाठी गेले.

Pune Crime news, Pune News
मुख्यमंत्र्यांवरील टीकेनंतर गुलाबराव पाटलांनी राणेंना करुन दिली त्या दोन पराभवांची आठवण

काही वेळानंतर पती वॉशरूमला गेला. तो वॉशरूमला गेल्याचे पाहून आरोपी भोंग याची नियत फिरली. त्याने अचानक गाडी सुरू केली आणि महिलेचे अपहरण केले. ‘तू जर आरडाओरड केलीस तर जीवे मारुन टाकेन’ अशी धमकी पिडीत महिलेला दिली. त्यानंतर स्वारगेट बस स्थानकाच्या परिसरात फुटपाथवर या महिलेला नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. तर पुन्हा बस कात्रज परिसरात नेली आणि तेथील फुटपाथवर दुसऱ्यांदा बलात्कार केला. महिलेचा तिला शोधत होता. या प्रकरणी पोलिसांनी चालकाला बंगळुरु हायवेवर अटक केली.

काही महिन्यांपूर्वी पुण्यात एका रिक्षाचालकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. शहरातील रेसकोर्स परिसरात आरोपीने त्याच्या रिक्षाने प्रवास करणाऱ्या मुलीकडे रिक्षाचे भाडे देण्यासाठी पैसे नव्हते. याचा फायदा घेऊन आरोपी रिक्षाचालकाने या मुलीला रेसकोर्स जवळील एका झाडीत नेले आणि तिथे तिच्यावर बलात्कार केला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत रिक्षाचालकासह त्याच्या तीन साथीदारांनाही अटक केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in