अजित पवार नसते तर महाआघाडी सरकारचं टिकलं नसतं : मोहितेंचा खळबळजनक दावा

आमचं राजकारणच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अवलंबून आहे, त्यामुळे त्यांनी सांगितले येथे बटण दाब की आम्ही ते बटन दाबणार. त्यांना मतदान कर, असे म्हटलं की आम्ही करणार आहे.
अजित पवार नसते तर महाआघाडी सरकारचं टिकलं नसतं : मोहितेंचा खळबळजनक दावा
Ajit Pawar-Dilip MohiteSarkarnama

मुंबई : गेल्या दोन ते अडीच वर्षांत मंत्रालयात आल्यानंतर फक्त अजित पवारच (Ajit Pawar) असायचे. सगळ्या पक्षाचे आमदार त्यांना भेटून समस्या सांगायचे. ते सर्वांना मदत करण्याचे काम करायचे. कदाचित अजित पवार नसते, तर हे महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारसुद्धा टिकलं नसतं, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते (Dilip Mohite) यांनी केला. (Without Ajit Pawar, MahaAghadi government would not have survived : Mohite)

खेड तालुक्यातील प्रश्न मार्गी लागत नसल्यामुळे आमदार मोहिते यांनी राज्यसभा निवडणुकीच्या दिवशी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याशी चर्चा करत त्यांना मतदानास राजी केले. नाराज मोहिते यांनी माध्यमाशी बोलताना आपली नाराजी दर्शविली होती.

Ajit Pawar-Dilip Mohite
शिवसेनेच्या संजय पवारांना काँग्रेस-राष्ट्रवादीने दिली पहिल्या पसंतीची १४ मते!

ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकार खऱ्या अर्थाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच चालवले, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आमच्यासाख्या आमदारांचा ते विचार करतात, तर बाकीच्यांनी का करू नये. माझ्यावर अन्याय होत असेल तर मी काहीतरी भूमिका घेतली पाहिजे. गेली एक वर्षभर मंत्रालयात आमच्या खेड तालुक्यातील विकास कामांसदर्भातील फायली पडून आहेत. त्यात माझा काही दोष नाही, त्या काही माझ्या वैयक्तीक कामाच्या नाहीत.

Ajit Pawar-Dilip Mohite
'आमचं काम फत्ते : ‘आयसोलेट’ असताना फडणवीसांनी काय केले, हे निकालात दिसेल'

खेड तालुक्यातील पंचायत समिती, पोलिस ठाणे, प्रशासकीय इमारतींच्या संदर्भातील त्या फायली आहेत. या सर्व गोष्टी संपूर्ण खेड तालुक्याच्या आहेत आणि मी तालुक्यासाठी मागतोय, त्याला आडकाठी आणण्याचे काही कारण नाही. असले राजकारण कोणी करू नये. आमचं राजकारणच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अवलंबून आहे, त्यामुळे त्यांनी सांगितले येथे बटण दाब की आम्ही ते बटन दाबणार. त्यांना मतदान कर, असे म्हटलं की आम्ही करणार आहे. त्यांनीसुद्धा माझ्यासाठी खूप प्रयत्न केले. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला. तरीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी ऐकले नाही, त्याचा राग माझ्या मनामध्ये आहे, असे मोहिते यांनी मतदानापूर्वी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

Ajit Pawar-Dilip Mohite
लक्ष्मण जगतापांनी फडणवीसांना 'सीएम साहेब' म्हणून हाक मारली!

आमदार मोहिते यांच्या नाराजीसंदर्भात राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी सांगितले की, आमदार दिलीप मोहिते आमचे ज्येष्ठ सहकारी आहेत. पुणे जिल्हा सहकारी बॅंकेत ते आमची सहकारी संचालक आहेत. एका घरात भांड्याला भांडं लागतच असतं. त्यांचे काही प्रश्न असतील, त्यांच्या भावना जाणून घेत त्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दिले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in