राष्ट्रवादीच्या कार्यालयातील काळी बाहुली हटवा

आमच्या कार्यालयात देवाचाही फोटो नाही, तर मग अशा बाहुल्या लावायचा विषय येत नाही.
prashant jagtap.jpg
prashant jagtap.jpg

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नव्या पक्ष कार्यालयात काळी बाहुली लावण्यात आलेली आहे, यामुळे अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात असून, राष्ट्रवादीने ही चूक सुधारून त्वरित बाहुली हटवावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे.(withdraw the black dolls in the NCP office) 

राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे कार्यालय शिवाजीनगरला डेंगळे पूल येथे सुरू करण्यात आले आहे. या नव्या कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले होते.या कार्यालयाबाहेर काळी बाहुली, लिंबू मिर्ची व कोहळे लावलेली आहे. राष्ट्रवादी हा पुरोगामी विचारांचा पक्ष असल्याने त्यांच्याकडून अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आक्षेप घेतला आहे. अंधश्रद्धा घालविण्यासाठी प्रयत्न करत असताना अशा गोष्टी घडत आहेत. पक्षाच्या माध्यमातून राजकारण करताना व नागरिकांमध्ये जाताना वैज्ञानिकतेचा अभाव दिसून येत आहे. उलट लोकप्रतिनिधींनी याबाबत जास्त दक्ष असणे आवश्‍यक असल्याने ही बाहुली, लिंबू मिर्ची हटवून चुक दुरुस्त करावी अशी मागणी अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर आम्ही बाहुली, लिंबूमिर्ची लावलेली नाही. या इमारतीमध्ये सुमारे २२ कार्यालये आहेत. हा विषय संबंधित जागा मालकाचा आहे. आमच्या कार्यालयात देवाचाही फोटो नाही, तर मग अशा बाहुल्या लावायचा  विषय येत नाही. त्यामुळे आमचा याच्याशी काही संबंध नाही, असे स्पष्टीकरण पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिले आहे.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com