पुण्यातील नगरसेवकांची संख्या जाणार १८३ वर ?

सर्वच महापालिकांमध्ये नगरसेवकांची संख्या दहा टक्केनी वाढणार आहे.
Pmc Pune
Pmc PuneSarkarnama

पुणे : पुणे महानगरपालिकेत सध्या असलेली १६२ नगरसेवकांची संख्या १८३ पर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मुंबई महापालिका प्रांतिक अधिनियमात सुधारण्यात करण्यात येणार असून यामुळे राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये नगरसेवकांची संख्या दहा टक्केनी वाढणार आहे.

शहराची लोकसंख्या ३० लाख असेल तर १६१ नगरसेवक तसेच पुढील प्रत्येक एक लाख लोकसंख्येमागे एक नगरसेवक या सध्याच्या तरतुदीत बदल करण्यात येणार आहे. या बदलाचा प्रस्ताव येत्या मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणला जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

Pmc Pune
पटोलेंचा इशारा; आता नुरा कुस्ती चालणार नाही

सध्याच्या कायद्यानुसार लोकसंख्येच्या प्रमाणात नगरसेवकांची संख्या निश्चित होत असते. आगामी निवणुका २०११ च्या जनगणेनुसार होणार आहेत. प्रत्यक्षात सध्याची लोकसंख्या २०११ पेक्षा कितीतरी अधिक आहे. मतदारसंख्येतील ही तफावत दूर करण्यासाठी कायद्यात दुरूस्ती करण्यात येणार आहे.यानुसार ३० लाख लोकसंख्येला १६१ नगरसेवक तर त्यापुढील प्रत्येक एक लाख लोकसंख्येमागे एक नगरसेवक या ततुदीत बदल करण्यात येणार आहे.

Pmc Pune
पुणे-पिंपरीत अजित पवारांना जमेना म्हणून शरद पवार लक्ष घालणार का ?

गेल्या पाच वर्षात पुणे महापालिकेत समावेश झालेल्या गावांची लोकसंख्या तसेच पुण्याची वाढलेली लोकसंख्या गृहीत धरली तर ती संख्या ३५ लाख आहे.कायद्यात दुरूस्ती झाल्यानंतर नगरसेवकांच्या संख्येत १० टक्केनी वाढ झाल्यानंतर पुण्यातल्या नगरसेवकांची संख्या १७ नी वाढण्याची शक्यता आहे.

पुण्यातील नगरसेवक १७ नी वाढू शकतात

सुधारीत कायद्यातील तरतुदीनुसार पुणे महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या १७ नी वाढू शकते. सध्या महापालिकेत १६६ नगरसेवक होत आहे. त्यामध्ये १० टक्के वाढ गृहीत धरली तर ही संख्या १७ ने वाढून होऊन १८३ पर्यंत जाईल.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com