राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लगेच होणार की सरकार एक ऑगस्टपर्यंत थांबणार ?

न्यायालयाने (Supreme court Of India) केवळ अपात्रतेच्या कारवाई संदर्भात ‘जैसे थे’ची स्थिती कायम ठेवावी, असे न्यायालयाने म्हटल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
 Eknath Shinde| Devendra Fadanvis
Eknath Shinde| Devendra FadanvisSarkarnama

पुणे : राज्यातील सत्ता संघर्षात सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court Of India) आज कुठलाही ठोस निर्णय दिलेला नाही. यापुढची सुनावणी एक ऑगस्टला होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लगेच करणार की राज्य सरकार (State Government) एक ऑगस्टपर्यंत थांबणार ही चर्चा आता सुरू झाली आहे.

 Eknath Shinde| Devendra Fadanvis
महाविकास आघाडीच्या नेत्यांना आता ‘चुल्लूभर’ पाण्यात बुडून मरावे !

या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. अपात्रतेच्या कारवाईबाबत ‘जैसे थे’च्या आदेशाव्यतिरिक्त न्यायालयाने कोणतेही ठोस आदेश दिलेले नाहीत. आजच्या सुनावणीवर भाष्य करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच करू, असे मोघमपणे म्हटले आहे. न्यायालयाने अपात्रेच्या कारवाईबाबत ‘जैसे थे’ चे आदेश दिले आहेत. मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत न्यायालयाने स्पष्टपणे काहीही म्हटलेले नाही, असा अर्थ सत्तारूढ पक्षाकडून काढण्यात आला आहे. त्यामुळे उद्या किंवा येत्या काही दिवसात मंत्रीमंडळाचा विस्तार करणार की एक ऑगस्टपर्यंत थांबणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

 Eknath Shinde| Devendra Fadanvis
शिवसेना सोडायची तर मर्दासारखी सोडा, रडून सोडू नका

न्यायालयाने केवळ अपात्रतेच्या कारवाई संदर्भात ‘जैसे थे’ची स्थिती कायम ठेवावी असे न्यायालयाने म्हटल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. विषय न्यायालयात प्रलंबित असल्याने या विषयावर अधिक बोलणे योग्य होणार नाही, असे सांगत त्यांनी आधिक बोलण्याचे टाळले. मंत्रीमंडळाचा विस्तार लवकरच करू, असे त्यांनी सांगितले तरी त्यात ठोसपणा नव्हता. त्यामुळे विस्तार खरोखरच होणार की राज्य सरकार एक ऑगस्टची वाट पाहणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन सुमारे १९ दिवसांचा कालावधी लोटला. मात्र, मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही. या विषयावरून विरोधी पक्षनेत्यांनी राज्य सरकारला धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी महापुराचा तडाका बसला आहे. या परिस्थितीमध्ये राज्यात मंत्रीमंडळ अस्तित्वात नाही. केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्याचा कारभार हाकत आहेत, अशी टीका अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह विरोधकांकडून करण्यात येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in