Maharashtra Cabinet Expansion: नव्या मंत्रिमंडळात पुण्याला संधी मिळणार का? 'या' नावांची चर्चा

Maharashtra Politics| सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्य मंत्रिमंडळाचा मार्ग मोकळा झाला आहे.
Madhuri Misal | Sunil Kamble
Madhuri Misal | Sunil KambleSarkarnama

Maharashtra Cabinet Expansion : गेल्या दहा-अकरा महिन्यापासून संपुर्ण देशाचे लक्ष वेधून घेतलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाला निकाल लागला. शिंदे सरकार वाचले. यानंतरही राज्यातील राजकारणात मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत. सत्तांतरानंतर रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी राज्य सरकारच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. तर अनेक इच्छुकांच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत. (Will Pune get a chance in the new cabinet)

याच पार्श्वभूमीवर नव्या मंत्रिमंडळ विस्तारात (Cabinet Expansion) पुण्याला संधी मिळणार का, असाही प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. पुणे शहरातून कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे सध्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्रीपद देण्यात आले आहेत. यांच्याशिवाय आता माधुरी मिसाळ, सुनील कांबळे यांची नावे सध्या चर्चेत आहेत. त्यामुळे या नेते मंडळींच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

Madhuri Misal | Sunil Kamble
Uddhav Thackeray On Fadnavis : ''...तर लोकं उद्या मोदींप्रमाणेच फडणवीसांच्या डिग्रीवरही संशय घ्यायला लागतील !''

न्यायालयाच्या निर्णयानंतर आता येत्या काही दिवसातच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहेत. विशेष म्हणजे आगामी पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुका लक्षात घेऊन दोन्ही शहराला मंत्रीपद किंवा राज्यमंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता आहे. पुणे जिल्ह्यात सध्या २१ विधानसभा मतदारसंघांपैकी १२ मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आमदार आहेत. तर उरलेल्या नऊ मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. (Maharashtra Cabinet Expansion)

पुणे जिल्ह्यात ठाकरे गटाचा एकही आमदार नाही. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार, शिक्षण, संस्थांवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे वर्चस्व आहेत. त्यामुळे जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवायची असेल तर जिल्ह्याला मंत्रीपद द्यावे लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांना टक्कर देणारा नेता जिल्ह्यातून मंत्रीपदाच्या शर्यतीत असेल, अशीही चर्चा आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com