दुखावलेले पृथ्वीराज जाचक राष्ट्रवादीच्या विरोधात निवडणूक लढवणार का?

पृथ्वीराज जाचकांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या संचालकांनी कारखान्याच्या बैठकांना बसण्यास विरोध केला.
Prithviraj Jachak
Prithviraj Jachak Sarkarnama

वालचंदनगर (जि. पुणे) : ज्येष्ठ नेते शरद पवार (sharad pawar), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्या आग्रहामुळे छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कारभारात सक्रीय झालेल्या पृथ्वीराज जाचकांना (Prithviraj Jachak) राष्ट्रवादी काँग्रेसच्या संचालकांनी बैठकांना बसण्यास विरोध केला. त्यामुळे दुखावलेले जाचक व त्यांचे समर्थक हे आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विरोधात पॅनेल उभे करणार का? याकडे इंदापूर तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. कारखाना निवडणुकीसंदर्भात काय भूमिका घ्यायची याची रणनीती ठरविण्यासाठी येत्या गुरुवारी (ता. २५ नोव्हेंबर) जाचक समर्थकांची बैठक होणार आहे. (Will Prithviraj Jachak contest Chhatrapati Karkhana elections against NCP?)

इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना इंदापूरबरोबरच बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचा आहे. या दोन्ही तालुक्याचा उस या कारखान्याला जातो. कारखान्याची संचालक मंडळाची मुदत मे २०२० संपली आहे. पण, काेरोना व न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेमुळे कारखान्याची निवडणूक लांबणीवर पडली आहे.

Prithviraj Jachak
गृहमंत्री वळसे पाटलांच्या भीमाशंकर कारखान्याने फोडली एफआरपीची कोंडी!

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी दीड वर्षापूर्वी चर्चा केल्यानंतर राज्य साखर संघ आणि छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष असलेले पृथ्वीराज जाचकांनी पवार कुटुंबीयांशी जुळवून घेतले होते. त्यानंतर त्यांनी श्री छत्रपती कारखान्याच्या कारभारात लक्ष घालण्यास सुरुवात केली. जाचक यांना सहकार क्षेत्र व साखर कारखानदारीचा प्रदीर्घ अनुभव आहे. गेल्या गाळप हंगामात जाचक यांनी कारखान्याच्या कारभारत लक्ष घातल्याने विक्रमी साखर उत्पादन झाले. तसेच, साखरेचा दर्जाही सुधारल्याचे जाचक यांचे समर्थक व सभासद सांगतात.

Prithviraj Jachak
...अन्यथा पहिल्या बैठकीपासूनच PMRDAविरोधात संघर्ष

गेल्या महिन्यात ८ ऑक्टोबर रोजी जाचक यांना कारखान्याच्या बैठकीत बसण्यास काही संचालकांनी विरोध केला. त्यामुळे राष्ट्रवादीचे संचालक मंडळ व जाचक यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला आहे. त्या घटनेनंतर जाचक यांनी कारखान्याच्या कामकाजामध्ये लक्ष घालणे टाळले आहे. छत्रपती कारखान्याला सलग उसपुरवठा न करणाऱ्या व थकबाकीदार सभासदांना मतदानाचा अधिकार देण्यात येऊ नये, अशी याचिका जाचक यांनी न्यायालयामध्ये दाखल केली आहे. मात्र, राज्य सरकाने कोरोनाच्या काळामध्ये परिपत्रक काढून ३१ मार्च २०२२ पर्यंत सर्व सहकारी संस्थांच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्व सभासदांना (क्रियाशिल व अक्रियाशिल) मतदानाचा अधिकार दिला आहे. या परिपत्रकाच्या विरोधातही जाचक यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली असून याची सुनावणी सुरु आहेत. त्यावर १ डिसेंबर रोजी सुनावणीची तारीख आहे.

Prithviraj Jachak
भाजपचा धुव्वा उडाला ; पण देशमुखांना सहकारात विरोधकच नाही, हा समज खोटा ठरला

संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये बसण्यास केलेल्या विरोधामुळे जाचक समर्थक दुखावले आहेत. छत्रपती कारखान्याच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीमध्ये काय भूमिका घ्यावी, याचा विचारविनीमय करण्यासाठी गुरुवारी (ता. २५ नोव्हेंबर) लासुर्णे येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन केले आहे. त्यास उपस्थित राहण्याचे आवाहन पृथ्वीराज जाचक, बाळासाहेब कोळेकर, शिवाजी निंबाळकर यांनी केले आहे. निवडणूक लढवण्याबाबत जाचक गट या बैठकीत निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com