चंद्रकांतदादांचा 'हा' सल्ला नेते ऐकणार का?

chandrakant patil : विरोध करण्यासाठी कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत.
chandrakant patil Latest News
chandrakant patil Latest News sarkarnama

पुणे : "राज्यातील राजकीय संस्कृती हा चिंतेचा विषय झाला आहे. नेत्यांची वादग्रस्त विधाने आणि त्यावरील प्रतिक्रिया चिंताजनक आहेत. याबाबत राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काही आचारसंहिता तयार करता येईल का, याचा विचार करावा", अशी सूचना भाजप नेते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी (ता.८ नोव्हेंबर) केली. ते अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह विधानासंदर्भात ते बोलत होते. (chandrakant patil Latest News)

chandrakant patil Latest News
नऊ डीसीपींची काल बदली अन् आज लगेच स्थगिती, चर्चांना उधाण...

पाटील म्हणाले, "अब्दुल सत्तार यांनी केलेले वक्तव्य चुकीचेच आहे. त्याचे समर्थन करणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्या विधानासाठी माफीचा आग्रह धरला. सत्तार यांनी माफी देखील मागितली. पण माफी मागितल्यावर, दिलगिरी व्यक्त केल्यावर त्यावरील गदारोळ संपायला हवा',असे पाटील म्हणाले.

लोकांना अशा प्रकारची विधाने अजिबात आवडत नाहीत, याचा नेत्यांनी विचार करावा. लोकांना नेत्यांनी विकासावर बोलायला हवे आहे', असेही पाटलांनी सांगितले.

chandrakant patil Latest News
'आधी कुंकू लाव..' प्रकरणं संभाजी भिडेंना भोवणार; रूपाली चाकणकरांनी दिले कारवाईचे संकेत...

'हर हर महादेव' चित्रपटाला होणाऱ्या विरोधावरही पाटीलांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले, 'अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा टेंभा मिरवणाऱ्यांनी दुसऱ्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणू नये',असा टोलाही पाटलांनी लगावला.

तसेच, मी अजून चित्रपट पाहिला नाही. पाहिल्यानंतरच त्याबाबत अधिक भाष्य करू शकेल. मात्र विरोध करणारे लोक प्रेक्षकांना चित्रपटगृहातून हुसकावून कसे लावतात? चित्रपटागृहाबाहेर त्यांनी पाट्या घेऊन उभे राहावे. विरोध करण्यासाठी कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत, त्याचा वापर करावा, असा सल्लाही त्यांनी विरोधकांना दिला.

दरम्यान, पाटील म्हणाले, ‘‘अब्दुल सत्तार यांच्या विधानाचे समर्थन करणार नाही. पण खोके हा विषय कसा सुरू झाला? ते देखील लोकांना आवडत नाही. शिवसेना यापूर्वी फुटली नव्हती का? नारायण राणे, छगन भुजबळ यांना कोणी फोडले? त्यावेळी खोके नसतील, पेट्या होत्या. त्यामुळे एकांगी आरोप करायला नको. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची पक्षात घुसमट होत होती, त्यातून ते बाहेर पडले. त्यामुळे हे आरोप बंद व्हायला हवे.’’

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com