Mangaldas Bandal : कुणी कितीही अडविले तर लोकसभेची निवडणूक लढवणारच : मंगलदास बांदलांची घोषणा

राज्यातील राजकीय स्थिती गोंधळाची आहे, त्यामुळे आगीतून उठून फुफाट्यात पडायचे जाणीवपूर्वक टाळत आहे.
Mangaldas Bandal
Mangaldas BandalSarkarnama

शिरूर (जि. पुणे) : कुणी कितीही अडविण्याचा प्रयत्न केला तरी राजकारणातून बाजूला जाणार नसल्याचा निर्धार व्यक्त करतानाच आगामी सर्व निवडणुका सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन लढविणार असल्याचे, जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांनी आज येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले. राज्यातील राजकीय स्थिती गोंधळाची आहे, त्यामुळे आगीतून उठून फुफाट्यात पडायचे जाणीवपूर्वक टाळत असल्याचे सांगताना आगामी लोकसभा (Lok Sabha Election) निवडणूक लढविण्याचे सूतोवाचही त्यांनी केले. (Will contest the Lok Sabha elections: Mangaldas Bandal's announcement)

Mangaldas Bandal
Kasba By Election : रूपाली पाटील-ठोंबरे नव्या वादात : धंगेकरांना मतदान करतानाचा फोटो केला शेअर

जिरवाजिरवीच्या राजकारणातून माझ्याविरूद्धचे दहा-पंधरा वर्षांपूर्वीचे आर्थिक गुन्हे उकरून काढले. माझी जेलवारी राजकीय प्रेरीतच होती, असा आरोप बांदल यांनी केला. ते म्हणाले, वीस महिने मला कारावास भोगायला लावला यामागे कोण आहे, हे शिरूर तालुक्यातील जनतेला चांगलेच ठाऊक आहे. प्रशासनातील हुशार, उच्चशिक्षित, बीएस्सी ॲग्री माणसाकडून ही अपेक्षा नव्हती.

Mangaldas Bandal
Budget Session : शिंदे-फडणवीस सरकारपुढे मोठा पेच : राज्यमंत्री नसल्याने विधान परिषदेत अर्थसंकल्प कोण सादर करणार?

शिरूर तालुक्याची राजकीय परंपरा उज्ज्वल असताना माझ्याबाबतीत काहीजण खालच्या पातळीवर गेले. राजकारणात मतभेद असतात, पण वैरत्व असू नये. तालुक्यातील काही लोक डोळ्यात गेले तर खूपत नाहीत, पोटात गेले तर दुखत नाहीत पण करणीला कधी चुकत नाहीत, अशा प्रवृत्तीचे आहेत. अशा लोकांना भविष्यात उघडे करता येईल, एवढे त्यांच्या विरोधातील पुरावे माझ्याकडे आहेत. पण मी त्या वाटेने जाणार नाही. कारण माझ्या वाटेला जे आले ते इतरांच्या वाट्याला येऊ नये, अशी माझी भूमिका आहे. न्यायदेवतेवर आमचा पूर्ण विश्वास असून, माझ्यावरील केसेस खोट्या आहेत, हे न्यायदेवतेच्या दरबारात सिद्ध होईल, असा विश्वासही बांदल यांनी व्यक्त केला.

Mangaldas Bandal
BJP Leader's Claim : शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसही संपणार : भाजपच्या बड्या नेत्याचा धक्कादायक दावा

ज्यांनी मला जेलमध्ये पाठविले, त्यांना मनापासून शुभेच्छा

भगवान श्रीकृष्णाचा जन्मच कारागृहात झाला. लोकमान्य टिळक, पंडीत जवाहरलाल नेहरू, स्वातंत्र्यवीर सावरकर, नेल्सन मंडेला यांनाही कारावास भोगावा लागला. मी त्यांच्याशी स्वतःची तुलना करण्याइतका मोठा नाही. पण वीस महिन्यांच्या कारावासात मी तीनशे पुस्तके वाचली. त्यातून बौद्धीक ज्ञानात भर पडली. वेळच वेळ असल्याने नियमित व्यायाम करून मजबूत झाल्याने माझी शुगरही कंट्रोलमध्ये आली. त्यामुळे जेल म्हणजे अपमान असे मी मानत नाही. ज्यांनी मला जेलमध्ये पाठविले त्यांना मनापासून शुभेच्छा, असेही बांदल यांनी म्हटले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com