Kasba By-Election : काँग्रेस कसबा मतदारसंघाची पोटनिवडणूक लढवणार का? नाना पटोलेंनी स्पष्टच सांगितलं...

Kasba By-Election : नाना पटोले यांनी कसबा पोटनिवडणुकीवर भाष्य केले
Nana Patole
Nana PatoleSarkarnama

Kasba By-Election : चिंचवड विधानसभा मतदारसंघ आणि कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर होत चालली आहे. ही निवडणूक बिनविरोध होईल असे चित्र होते. मात्र, आता सर्वच पक्षाने ही निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी कसबा पोटनिवडणुकीवर भाष्य केले आहे.

नाना पटोले हे कसबा पोटनिवडणुकीबाबत बोलताना म्हणाले, ''या पोटनिवडणुकीबाबत भाजपचा प्रस्ताव काय येतोय, भाजप कोण उमेदवार देतंय, त्यानंतर आपण बोलू'', असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. ते आज पुण्यातील एका कार्यक्रमासाठी आले असता बोलत होते.

Nana Patole
Bhagatsingh Koshyari : राज्यपालांनी राजीनामा कोणाकडे द्यायचा असतो? स्वीकारण्याचा अधिकार कुणाला?

''कसबा विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न करू'', असं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले. यावर पटोले म्हणाले, ''महाराष्ट्राची आजपर्यंत एक पंरपरा राहिली आहे. कुटुंबातील व्यक्तीचा मृत्यू झाला तर ती निवडणूक बिनविरोध करण्याचे काम काँग्रेसने केले.

पण महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारच्या काळात देगलूर, कोल्हापूर आणि पंढरपूरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्या संबधित कुटुंबातील व्यक्तीला भाजपने विरोध केला होता. मात्र, आता कसबा विधानसभा पोटनिवडणुकीबाबत भाजपचा प्रस्ताव नेमकी काय येतोय? त्यांनी अजून उमेदवाराबाबत काही भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे त्यांचा प्रस्ताव काय येतो? त्यानंतर आपण बोलू'', असं पटोले म्हणाले.

Nana Patole
Chinchwad By-Election : चिंचवड पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीत इच्छुकांची गर्दी : 'या' सहा नावांची चर्चा!

''कसबा पोटनिवडणूक लढवण्यासाठी काँग्रेसमधील अनेक जण इच्छुक आहेत. यासाठी तब्बल 8 ते 10 जणांनी माझ्याकडे अर्ज केले आहेत. या मतदार संघात 1980 पर्यंत काँग्रेसचे प्राबल्य होतं. त्यामुळे येणाऱ्या काळात कसबा मतदारसंघ काँग्रेसकडे आणण्यासाठी आमचा मास्टर प्लान आहे. यासाठी आमचे काम सुरू आहे, असं ते म्हणाले. तसेच येत्या 3, 4 फेब्रुवारीपर्यंत आमचा उमेदवार जाहीर करू, असंही पटोले यावेळी म्हणाले.

Nana Patole
Nashik News : शिवसेना-'वंचित'ची युती होताच नाशिकमध्ये जल्लोष

दरम्यान, चिंचवड विधानसभा मतदारसंघ आणि कसबा पोटनिवडणुकीसाठी सर्वच पक्षातील अनेकजण इच्छुक आहेत. त्यामुळे आता ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार की येथे निवडणूक पार पडणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in