राज्यपालांविरोधातील आंदोलनात माजी महापौर टिळक, मोहोळ सहभागी होणार ?

PMC Former Mayor News : पुणे महापालिकेच्या माजी महापौरांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींविरोधात दंड थोपटले...
Mukta Tilak 
Murlidhar Mohol News
Mukta Tilak Murlidhar Mohol NewsSarkarnama

पुणे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानावर राजकीय वर्तुळातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. राज्यभरात विविध ठिकाणी कोश्यारींचा निषेध नोंदवला जात आहे. अद्यापही त्यांच्यावरील टीकेची धग कमी झालेली नाही. याच पार्श्वभूमीवर आता पुण्यात देखील पुणे महापालिकेच्या माजी महापौरांच्या संघटनेने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari ) यांच्याविरोधात दंड थोपटले असून आंदोलनाचं शस्त्र उपसलं आहे.

पुण्यातील माजी महापौर संघटना राज्यपाल भगतसिंह यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या विधानाचा निषेध करण्यासाठी पुण्यातील राजभवनासमोर आंदोलन करणार आहे. हे आंदोलन येत्या पाच डिसेंबर रोजी होणार आहे. या संघटनेचे 15 माजी महापौर सदस्य आहेत. यात भाजपच्या दोन महापौरांचा देखील समावेश आहेत.

Mukta Tilak 
Murlidhar Mohol News
Shivsena : खोक्यांची रक्कम वाढली ? गुवाहाटीत आमदारांना आणखी पाच कोटी ..

या आंदोलनासाठी महापौर संघटनेच्या वतीने राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे या आंदोलनात सध्याचे आमदार न माजी महापौर मुक्ता टिळक आणि मुरलीधर मोहोळ सहभागी होणार का याबाबत उत्सुकता आहे. कारण उघडउघड राज्यपालांच्या विधानाचे समर्थन करत नसले तरी त्यांच्या बचावासाठी अनेक नेते पुढे आले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी पुढाकार घेतलेल्या आंदोलनात भाजपचे माजी महापौर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.

Mukta Tilak 
Murlidhar Mohol News
राणीच्या बागेत गेल्यावर आधी काय बघणार? वाघ की पेंग्विग; मनीषा कायदेंचे स्पष्ट उत्तर

काय म्हणाले होते राज्यपाल..?

आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा शिक्षक आम्हाला विचारायचे, तुमचा आवडता नेता कोण? कुणी सुभाषचंद्र बोस, कुणी महात्मा गांधी, कुणी पंडित नेहरूंचं नाव घ्यायचं. मला वाटतं आता हा प्रश्न आला की तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हांला बाहेर जायची आवश्यकता नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला तुमचे आयकॉन मिळतील. छत्रपती शिवाजी महाराज तर जुन्या युगातले आहेत. मी आत्ताच्या काळाबाबत बोलतो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत अनेक आयकॉन आहेत असं विधान राज्यपाल कोश्यारी यांनी केलं होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in