Pune News: स्टॉलला लाथ मारणाऱ्या जगतापांवर कारवाई कधी ?; राजकीय पक्ष,पथारी संघटना आक्रमक

PMC Madhav Jagtap News: आयुक्तांनी जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
Pune Pmc
Pune Pmc Sarkarnama

PMC Madhav Jagtap News: तीन दिवसापासून पुण्यात अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ते एका छोट्या व्यावसायिकाची अन्न पदार्थांनी भरलेली भांडी लाथेने मारुन उडवत असल्याचे दिसते. या प्रकरणाची चौकशी करावी आणि माधव जगताप यांना बडतर्फ करावे. अशी मागणी आता जोर धरु लागली आहे.

माधव जगताप यांच्याविरोधात राजकीय पक्ष, पथारी संघटना आक्रमक झाल्या आहेत. जगताप यांच्यावर कारवाई करण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे केली आहे. दरम्यान या प्रकरणात आयुक्तांनी जगताप यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

या प्रकरणाची चौकशी करावी आणि माधव जगताप यांना बडतर्फ करावे, अशी मागणी आपचे राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांनी केली आहे.

Pune Pmc
Girish Mahajan Birthday: गिरीश महाजनांच्या होर्डिंगवर अजितदादा झळकले; नेमकं काय घडलं !

एक जबाबदार शासकीय अधिकाऱ्याकडून जनतेप्रती केलेले असे वर्तन हे अशोभनीय, बेकायदेशीर व असंवेदनशील आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिका आयुक्तांनी अतिक्रमण विभाग प्रमुख माधव जगताप यांना बडतर्फ करायला हवे अशी मागणी कुंभार यांची आहे. खासदार सुप्रिया सुळे, आमदार सुनील टिंगरे यांनी कारवाई करण्याची मागणी केली आहे.

महापालिका आयुक्तांनी जगताप यांच्यावर निलंबनाची कारवाई करावीच, पण त्याच सोबत पथारी व्यावसायिकांना त्यांचे हक्कही दिले पाहिजेत, अशी मागणी मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी केली आहे.

Pune Pmc
DK Shivakumar News : कर्नाटकाच्या CM पदावर दावा सांगणाऱ्या डी.के. शिवकुमारांबाबत मोठी बातमी ; सुप्रीम कोर्टानं..

"माधव जगताप यांनी केलेली कृती योग्य नाही, त्यामुळे ही चूक कशी झाली यावर त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागितला आहे. त्यांचे उत्तर आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल," असे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी सांगितले.

नेमकं काय घडलं होतं...

गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावर (फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता) अतिक्रमण कारवाई सुरू असताना माधव जगताप यांनी खाद्य पदार्थाच्या स्टॉलवरील गॅसला लाथ मारली. त्यामुळे उकळते तेल ही खाली सांडलेच, पण भांडे देखील पाडले. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावर टीकेची झोड उठली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com