लग्नाला म्हणून आला अन्‌ कोर्ट परिसरात येऊन पत्नीचा काटा काढला!

शिरूरमध्ये पतीने केलेल्या गोळीबारात पत्नीचा मृत्यू; सासू जखमी; हल्लेखोर निवृत्त लष्करी कर्मचारी
Deepak Dhavle-manjula Dhavle
Deepak Dhavle-manjula DhavleSarkarnama

शिरूर : पोटगीच्या दाव्यासंदर्भात शिरूर (shirur) न्यायालयात आलेल्या पत्नी आणि सासूवर पतीने पिस्तूलातून गोळीबार (Firing) केला. पतीने चार गोळ्या झाडल्या. त्यातील तीन गोळ्या लागून पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे, तर सासू एक गोळी लागून जखमी झाली आहे. सासूला तातडीने शिरूरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्लेखोराने पोलिस (Police) आणि जमाव पाहून हवेतही गोळीबार केला. पोलिसांनी हल्लेखोरास ताब्यात घेतले आहे. आपण एका लग्नाला आल्याचे त्याने पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितले. या प्रकारामुळे शिरूरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. (Wife shot dead by husband in Shirur)

दीपक पांंडुरंग ढवळे (वय ४५, सध्या राहणार अंबरनाथ, जि. ठाणे, मूळ रा. पारनेर, जि. नगर ) असे हल्लेखोराचे नाव आहे. तो लष्करातून निवृत्त झाला आहे. त्याने केलेल्या गोळीबारात पत्नी मंजुळा दीपक ढवळे (वय ३५) हिचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दीपक याची सासू तुळसाबाई रंगनाथ झांबरे (वय ५५, दोघीही रा वाडेगव्हाण, ता. पारनेर, जि. नगर) ही एक गोळी लागून गंभीर जखमी झाली आहे.

Deepak Dhavle-manjula Dhavle
परिचारकांनी वाढविले समाधान आवताडेंचे टेन्शन; इच्छुकांना अर्ज भरण्याचे आदेश!

संबंधित लोक हे पारनेर तालुक्यातील येथील असून त्यांनी दाखल केलेल्या पोटगीच्या दाव्याचा आज शिरूर न्यायालयात निकाल होता. त्या निकालासाठीच ढवळे आणि झांबरे कुटुंबीय शिरूरच्या न्यायालयात आले होते. मंजुळा ढवळे हिने पतीविरोधात पोटगीचा दावा दाखल केला होता. त्याची सुनावणी शिरूरच्या न्यायालयामध्ये सुरू होती, त्या दाव्याचा आज निकाल होता.

Deepak Dhavle-manjula Dhavle
हितेंद्र ठाकूरांची भूमिका गुलदस्त्यात; मुख्यमंत्री शेवटच्या क्षणी पवारास्त्र वापरणार?

या निकालासाठी दीपक ढवळे आपल्या भावासह आला होता. येताना त्याने पिस्तूल, दोन पिस्टल आणि सुरा सोबत आणला होता. आपण लग्नाला आल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. मंजुळा ही आई तुळसाबाई यांच्याबरोबर न्यायालयात आली होती. न्यायालयाच्या परिसरात सुरुवातीला या तिघांमध्ये बाचाबाची झाली, त्यानंतर हल्लेखोर दीपक ढवळे याने कमरेचा पिस्तूल काढून फायरिंग केले. यामध्ये पत्नी मंजुळा हिचा तीन गोळ्या लागल्याने जागीच मृत्यू झाला, तर सासू तुळसाबाई ही एक गोळी लागून गंभीर जखमी झाली आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Deepak Dhavle-manjula Dhavle
राज्यसभा निवडणूक : अपक्ष आमदारांसाठी महाडिकांनी अशी लावलीय फिल्डिंग!

दीपक आणि मंजूळा यांच्यातील पोटगीचा दावा शिरूर न्यायालयात दाखल करण्यात आलेला होता. त्या दाव्याचा आज निकाल होता. त्यापूर्वीच दीपक ढवळे याने सासू आणि पत्नीवर गोळीबार केला, त्यात पत्नीचा जागीच मृत्यू झाल, तर सासू गंभीर जखमी झाली आहे. हल्लेखोर दीपक पांंडुरंग ढवळे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com